Kishori Shahane Dance: ९०च्या दशकात मराठी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि जबरदस्त नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या किशोरी शहाणे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नेहमी सुंदर फोटो, डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. तसंच सोशल मीडियावर ट्रेंड देखील फॉलो करताना दिसतात. नुकताच किशोरी शहाणे यांनी एक एनर्जेटिक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. हा डान्स व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात झळकल्यानंतर किशोरी शहाणे ( Kishori Shahane ) हिंदी मालिकांमध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या किशोरी शहाणे ‘झी टीव्ही’वरील ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेत काम करत आहेत. या मालिकेत त्यांनी बबिता आहुजा हे पात्र साकारलं आहे. काही दिवसांपूर्वी किशोरी शहाणे लेकाबरोबर आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. याचे फोटो व्हायरले झाले होते.

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

नुकताच किशोरी शहाणे ( Kishori Shahane ) यांनी डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील किशोरी यांची एनर्जी तरुणांना लाजवेल अशी आहे. यामध्ये त्यांनी वरुण धवनचा आगामी चित्रपट ‘बेबी जॉन’मधील ‘नैन मटक्का’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. किशोरी शहाणेंचा एनर्जेटिक डान्स पाहून नेटकरी कौतुक करत आहेत.

हेही वाचा – एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…

किशोरी शहाणेंच्या ( Kishori Shahane ) डान्स व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “किशोरीताई एकच नंबर”, “मॅम, तुमची एनर्जी जबरदस्त आहे”, “खूप छान”, “वा ताई, क्या बात है”, “तुमच्या एनर्जीने माझा दिवस बनवला”, “लय भारी ताई”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हेही वाचा – Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी किशोरी शहाणे ( Kishori Shahane ) यांनी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांची भेट घेतली होती. त्यांच्या हिंदी मालिकेच्या सेटच्या बाजूला अशोक सराफ चित्रीकरण करत असल्याचं समजात किशोरी शहाणे यांनी लगेच जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर हेमांगी कवी देखील होती. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress kishori shahane dance on varun dhawan song video goes viral pps