मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकरला ओळखले जाते. क्रांतीने ‘कोंबडी पळाली’ या गाण्याच्या तालावर सर्वांनाच थिरकायला लावले. क्रांती ही सतत तिच्या जुळ्या मुलींबद्दल पोस्ट शेअर करताना दिसते. मात्र नुकतंच क्रांतीने तिच्या जुळ्या मुलींपैकी एकीला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले आहे. तिने याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.
क्रांतीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तिच्या दोन्हीही मुली झिया आणि झायदा दिसत आहे. या व्हिडीओत झायदा ही झियाला चालण्यासाठी मदत करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओबरोबरच क्रांतीने त्यांच्या शाळेत घडलेला एक किस्साही सांगितला आहे.
आणखी वाचा : पाच वर्षांनी क्रांती रेडकरने दाखवला मुलींचा चेहरा, म्हणाली “त्या दोघी ९५ टक्के…”
क्रांती रेडकरची पोस्ट
“माझी मुलगी झिया हिला दुखापत झाल्याने तिच्या पायाला महिनाभर प्लास्टर करण्यात आलं होतं. आता ते काढलं आहे. ती अजूनही चालायला शिकत आहे. ती खूपच धाडसी, संयमी आणि समजूतदार आहे. पण इथे आमची खरी हिरो ही मिस छबिल वानखेडे आहे, जी सावलीसारखी तिच्या पाठीशी उभी आहे.
आम्ही ओपन हाऊससाठी शाळेत गेलो होतो, तेव्हा मला शाळेतील कर्मचारी सांगत होते की, “झायदा किती करते झियासाठी. ती तिची काळजी घेते. तिच्या बॅगेतून पुस्तक काढते. पुन्हा ती भरुनही ठेवते. जर ती वॉशरुमला गेली असेल तर ती बाहेर येईपर्यंत थांबते. तिचा टिफीन उघडून देते. झियाच्या पायाला प्लास्टर होते. पण असे असताना झायदा मात्र तिला प्रत्येक कामात मदत करत होती.”
आपण ओपन हाऊस झाल्यानंतर घरी आलो आणि आम्ही सर्वांनी दोन्ही मुलींसाठी उभे राहून टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केले. या कठीण काळात आम्हाला आनंदाने पुढे जाण्यासाठी दिलेल्या सर्व शक्तीसाठी मी देवाचे आभार मानते”, असे क्रांती रेडकरने म्हटले आहे.
आणखी वाचा : क्रांती रेडकर ‘या’ कारणामुळे झोपते घरातील सोफ्यावर, म्हणाली “माझा नवरा…”
दरम्यान क्रांती रेडकर ही कायमच तिच्या जुळ्या मुलींच्या गंमतीजमतीही पोस्ट करताना दिसते. क्रांतीने २०१८ मध्ये दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. झिया आणि झायदा अशी त्यांची नावं आहेत. त्या आता ५ वर्षांच्या आहेत. त्या दोघीही क्रांतीची दमछाक करताना दिसतात. ती तिच्या लेकीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असताना दिसतात. क्रांतीने आपल्या मुलींचे चेहरे आतापर्यंत कधीच दाखवले नाहीत.