अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सतत व्हिडीओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांबरोबर संपर्कात असते. काही दिवसांपूर्वी तिनं एक व्यक्ती तिला जेवण भरवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता क्रांतीचा दिग्दर्शक व लेखक अभिजित पानसेंबरोबरचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “भारतात मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात” किरण मानेंनी शेअर केलेलं मीम चर्चेत; म्हणाले, “एका फटक्यात….”

सध्या क्रांती रेडकर ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करत असून या सेटवरील ती व्हिडीओ नेहमी शेअर करत असते. नुकताच तिनं अभिजित पानसे यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघं एकमेकांची मस्करी करताना दिसत आहेत.

हेही वाचा – कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ एका फेसबुक लाईव्हमुळे झाला होता मोठा राजकीय गोंधळ; किस्सा सांगत म्हणाला…

व्हिडीओत क्रांती सांगितेय की, “मी माझ्या व्हिटॅमिनच्या गोळ्या खाल्ल्या तर लगेच याने काही गरज नसताना स्वतःच्या गोळ्या मागवून घेतल्या. आता असं दाखवतोय त्याचं लक्ष नाहीये. पण त्याचे कान माझ्याकडे आहेत. हे सगळं वयामुळे होतंय. वय झाल्यामुळे आता तरुण राहण्यासाठी गोळ्या खातोय. त्याला आता बोलायचं आहे. माझा अपमान करायचा आहे. पण ते तो करत नाहीये. मला काहीच फरक नाही पडत. तुमच्याकडे माझं लक्षच नाहीये, असं दाखवतोय.”

त्यानंतर अभिजित पानसे क्रांतीची मस्करी करताना पाहायला मिळतात. ते फोन कानाला लावून म्हणतात की, “हा तो क्रांतीचा प्रोब्लेम आहेच. काळजी करू नकोस, तिला मी शिकवतो. ती आता व्यवस्थित करतेय. दिग्दर्शनात पडली ठीक आहे रे. ‘रेनबो’ वगैरे ठीक आहे. मी तिला मार्गदर्शन केलं होतं. आता ती माझ्याबरोबर काम करतेय. ते फॉलोवर्स वगैरे तिच्या रील्सचे आहेत. बाकी सगळ्याबाबतीत ती मलाच फॉलो करते. आता तिचं यश खूप मोठं आहे.”

हेही वाचा – “मी पवित्र…”; राखी सावंतचा नवा व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, “पुरुषांनी मला स्पर्श…”

जेव्हा अभिजित पानसे क्रांतीची मस्करी करू लागतात तेव्हा क्रांती मागून म्हणते की, “हे सगळं त्याला मगापासून बोलायचं होतं. पण काय करणार. शेवटी खेचाखेचीमध्ये लाइनवर आलाच.”

असा हा मजेशीर व्हिडीओ क्रांतीनं शेअर करत लिहीलं आहे की, “कॉलेजमधले मित्र असल्यावर हे असं होतं. एकदम वेडेपणा. पण हा माणूस एक हिरा आहे. अभिजित पानसे आणि अश्विनी पानसे मी तुमच्या दोघांवर खूप प्रेम करते. तुम्ही माझ्यावर प्रेम करता, माझी काळजी घेता याबद्दल तुमचे धन्यवाद.”

हेही वाचा – रजनीकांत ठरले भारतातील सर्वात महागडे अभिनेते; ‘जेलर’साठी घेतलेलं मानधन ऐकून व्हाल थक्क

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला ‘हा’ क्षण आठवला की डोळ्यात येतं पाणी; म्हणाली, “करिअर संपलं…”

दरम्यान, क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं स्वतः दिग्दर्शित केलेला ‘रेनबो’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यापूर्वी क्रांतीनं ‘काकण’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress kranti redkar share new video with abhijit panse pps