‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारण आहे गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा. २० नोव्हेंबरपासून मालिकेत गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा सुरू झाली आहे. काही प्रेक्षकांना मालिकेची नवी कथा चांगलीच पसंतीस पडली आहे. तर काही प्रेक्षक मालिका बंद करण्याची मागणी करत आहेत. दुसऱ्याबाजूला मालिकेचं नवीन कथानक सुरू झाल्यापासून नवीन कलाकार पाहायला मिळत आहे. कालच्या भागात जयदीपच्या पुनर्जन्म असलेल्या अधिराजच्या आईच्या भूमिकेत एक प्रसिद्ध अभिनेत्री झळकली.
हेही वाचा – Bigg Boss 17: राखी सावंत पती आदिल खानबरोबर बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार? ड्रामा क्वीन खुलासा करत म्हणाली…
नवीन कथेनुसार, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत जयदीपचा अधिराज तर गौरीचा नित्या म्हणून पुनर्जन्म झाला आहे. अधिराज हा रांगड्या शेतकऱ्याच्या रुपात झळकला आहे. तर गावंढळ गौरी सुशिक्षित नित्याच्या रुपात पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेत नवीन पात्र पाहायला मिळत आहेत. २० नोव्हेंबरच्या भागात ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक, मयुर पवार असे नवे चेहर झळकले. गिरीश ओक नित्याच्या वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. तर मयुर पवार हा लवली म्हणजेच अधिराजचा मैत्री म्हणून झळकला. त्यानंतर मालिकेच्या कालच्या (२१ नोव्हेंबर) भागामध्ये देखील काही नवे कलाकार झळकले. यामध्ये मालिकाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा चेहरा पाहायला मिळाला.
ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे माधवी जुवेकर. माधवी जुवेकर या अधिराज (जयदीप)च्या आईच्या भूमिकेत झळकल्या. तसेच अधिराजच्या वडिलांच्या भूमिकेत ‘तुला पाहते रे’ मालिकेतील अभिनेते मोहिनीराज गटणे पाहायला मिळाले. मालिकेच्या आजच्या भागांमध्ये अभिनेते हर्षदा खानविलकर यांची दमदार एन्ट्री होणार आहे.
दरम्यान, अभिनेत्री माधवी जुवेकर याआधी लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये झळकल्या होत्या. जोगतीणीच्या रुपात त्या दिसल्या होत्या. तसेच त्यांची ‘हे मन बावरे’ या मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली होती.