अभिनेत्री हेमांगी कवीने विविधांगी भूमिका साकारून मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही क्षेत्रात तिनं स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. हेमांगी मराठीसह हिंदीत अविरत काम करताना दिसत आहे. अशातच तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. हाच व्हिडीओ पाहून ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील मधुराणी प्रभुलकरने तिचं कौतुक केलं आहे. “तुझा अभिमान आहे”, अशी प्रतिक्रिया मधुराणीने हेमांगीच्या व्हिडीओवर दिली आहे. पण हेमांगीनं नेमकं काय केलं आहे? जाणून घ्या…

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी कामासंदर्भात चाहत्यांना माहित देत असते. नुकताच तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये हेमांगी सध्या ट्रेंड होतं असलेलं विकी कौशलचं ‘तौबा तौबा’ गाण्यातील हूकस्टेप शिकवताना दिसत आहे. तिच्या मजेशीर शैलीत हेमांगी डान्स शिकवताना पाहायला मिळत आहे. हेमांगीचा हाच व्हिडीओ पाहून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने कौतुक केलं आहे. एवढंच नव्हे तर इतर कलाकारांनी मंडळींनी देखील भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…

हेही वाचा – Video: जंतर मंतर बाई गं…, पूजा सावंत व तिच्या बहिणीचा सुकन्या मोनेंसह जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने हेमांगीचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया दिली आहे की, “मी खूप प्रयत्न केला. पण माझं मलाच कॉमेडी वाटतंय.” तसंच चेतन वेडनेरेनं प्रतिक्रिया देत लिहिलं, “१.०१…तुम्ही जितकं मागे जाल तितकं ते छान दिसेल, हे जे काय तू म्हणालीस ते मी फॉलो करतो आणि मागे जातो (डान्स पासून) तेच छान दिसेल माझ्या बाबतीत.” तर अभिनेत्री सुरभी भावे म्हणाली, “तौबा तौबा आपने “बातो बातो” में शिकव्या रे बाबा.” या कलाकार मंडळींसह चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: “माझ्या पोटावर पाय देऊ नका…”, दिव्या अग्रवाल व तिच्या पतीवर दलालने लावला फसवणुकीचा आरोप, म्हणाला…

दरम्यान, हेमांगी कवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या ‘सोनी टीव्ही’वरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या कॉमेडी शोमध्ये काम करत आहे. या शोमधील तिचे कॉमेडी व्हिडीओ सतत व्हायरल होतं असतात. याशिवाय हेमांगी ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेत पाहायला मिळत आहे. अलीकडेच ती कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात झळकली होती.

Story img Loader