स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली. या मालिकेत गृहिणी ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहत आर्थिकरित्या सक्षम झालेल्या अरुंधतीचा प्रवास प्रेक्षकांना खूप आवडला. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देताना दिसत आहेत. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरचा तर खूप मोठा चाहता वर्ग आहे. नुकतंच मधुराणीने राजकारणाबद्दल तिचे मत मांडले आहे.

मधुराणी प्रभुलकरने नुकतंच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला “मधुराणी राजकारणात येणार का?” याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने सविस्तरपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “…तर मग वेगळं झालेलं बरं” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरचं वक्तव्य चर्चेत

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Arvi Constituency, Amar Kale Wife Mayura Kale,
आर्वीत उमेदवार पत्नीसाठी पती, तर उमेदवार पतीसाठी पत्नी मैदानात
bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार

यावर बोलताना मधुराणी म्हणाली, “अजिबातच नाही. मी या सर्व गोष्टींपासून लांबच राहते. मी इव्हेंट्स करतच नाही. आई कुठे काय करते ही मालिका इतकी प्रसिद्ध झाली. त्या मालिकेत मी प्रमुख भूमिका साकारत असल्याने मला दर आठवड्यात एका इव्हेंटसाठी फोन येतो. यात उद्धाटन करण्यापासून ते हळदीकुंकू करण्यापर्यंत अनेक फोन असतात. पण मी जाणीवपूर्वक ते करत नाही. यात खूप पैसे मिळतात. जर मी तीन वर्षात अशाप्रकारचे इव्हेंट केले असते, तर मला मुंबईत घर बांधता आलं असतं.”

आणखी वाचा : “आमचा साडेतीन वर्षांचा संसार…” दोनदा घटस्फोट झालेल्या व्यक्तीबरोबर लग्न करणाऱ्या नेहा पेंडसेचे वक्तव्य, म्हणाली “लग्नानंतर स्त्रियांनाच…”

“पण मला असं वाटतं की मी इथे अभिनय करायला आली आहे. त्याच्यावरील माझं लक्ष हलता कामा नये. त्यामुळे मी इव्हेंट करत नाही किंवा अशाप्रकारे झटपट मिळणाऱ्या पैशांच्या मागे जात नाही. यात अनेकदा राजकारणाचा समावेश असतो. त्यामुळे माझ्याकडे कोणताही पक्ष किंवा राजकीय व्यक्ती आलेले नाहीत आणि येतील असंही मला वाटतं नाही. तो पिंड वेगळा आहे.

मी कलाकार म्हणूनच बरी आहे. राजकारणी होणार नाही. मी वेगळ्या पद्धतीने काम करेन. निवडणुका लढणार नाही. जर मला महिला सशक्तीकरणासाठी काम करायचं असेल तर मग ते मी माझ्या माध्यमातून करेन. याचा राजकारणाशी कोणताही संबंध नसेल. ते मी नक्कीच करेन”, असे मधुराणीने यावेळी सांगितले.

आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”

दरम्यान मधुराणीने २००३ मध्ये ‘इंद्रधनुष्य’ या मालिकेद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘हिच माझी मैत्रीण’ या दोन कार्यक्रमातही दिसली. तसेच तिने ‘सा रे ग म प: सेलिब्रिटी स्पेशल’ या कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे मालिकांबरोबरच मधुराणी ही चित्रपटातही झळकली. ‘लेकरु’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘सुंदर माझे घर’, ‘मणी मंगळसूत्र’, ‘जिथुन पडल्या गाठी’, ‘भाभीपीडिया’, यांसारख्या अनेक चित्रपटात ती झळकली.