छोट्या पडद्यावरील संगीत आणि नृत्यावर आधारित ‘अप्सरा आली’ हा कार्यक्रम कायमच चर्चेत असतो. या शो च्या पहिल्या पर्वाची विजेती साताऱ्याची माधुरी पवार ठरली होती. ‘अप्सरा आली’ या रिअॅलिटी शोमधून माधुरी ही घराघरात पोहोचली. त्यानंतर ती रानबाजार या वेबसीरिजमध्ये झळकली. नुकतंच माधुरीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत माधुरी पवार हे नाव कायमच पाहायला मिळते. नुकतंच माधुरीने इट्स मज्जा या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ती कायम जमिनीवर झोपते, असा खुलासा केला. विशेष म्हणजे यामागे तिने कारणही सांगितले आहे.
आणखी वाचा : “प्रथमेश लघाटेने प्रपोज केल्यानंतर होकार देण्यासाठी तीन दिवस का घेतले?” मुग्धा म्हणाली, “कारण मला…”

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

“मी घरी असताना खाली जमिनीवर झोपते. माझ्याकडे धनगर समाज वापरतात ती जान आहे. ती मी अंथरते त्यावर चादर टाकते आणि खाली झोपते. मी बेडवर झोपत नाही. कारण मला बेडवर झोप येत नाही”, असे माधुरी यावेळी म्हणाली.

“मी जेव्हा बाहेर फाईव्ह स्टार किंवा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये जाते तेव्हा माझी मोठी पंचायत होते. कारण तिथे बेडवर मोठमोठ्या गाद्या असतात. मी त्यावर झोपले की खाली जाते. मला त्यावर कधीच झोप लागत नाही. त्यामुळे मग अनेकदा मी हॉटेलमध्ये गेल्यावर बेडशीट काढते. ती खाली अंथरते आणि दुसरं अजून एक बेडशीट मागवून ते अंगावर घेऊन झोपते”, असे माधुरीने सांगितले.

आणखी वाचा : “तुम्ही लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला का?” उर्मिला मातोंडकर म्हणाल्या “माझ्या नवऱ्याने…”

दरम्यान माधुरीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. त्याबरोबरच ‘देवमाणूस’ या मालिकेच्या पहिल्या भागात दिसली होती. यात तिने चंदाचे पात्र साकारले होते. माधुरी पवार ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नृत्यासह तिच्या अभिनयामुळे घराघरात तिला ओळखले जाते.

Story img Loader