‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून मयुरी देशमुखकडे पाहिले जाते. दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीने आत्महत्या करत जीवन संपवलं. पती आशुतोष भाकरेच्या निधनानंतर मयुरी ही त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतंच मयुरीने याबद्दल पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
मयुरीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही पोस्ट शेअर करताना तिने काळ्या रंगाचा हार्ट इमोजी शेअर केला आहे.
आणखी वाचा : “नवरा जाऊन वर्षही झालं नाही आणि तू फिरतेयस” म्हणणाऱ्या युजरला मराठी अभिनेत्रीचं चोख उत्तर
मयुरी देशमुखची पोस्ट
“कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:ला सावरणाऱ्या महिलेपेक्षा धोकादायक काहीही असू शकत नाही. कोणीतरी तिला टाकलेल्या एखाद्या घाणीतूनही ती परत वर येऊ शकत असेल, तर ती कोणालाही घाबरु शकत नाही. ती तुमच्या अपमानाशीही जुळवून घेऊ शकते. त्यामुळे सावध राहा”, असे मयुरीने यात म्हटले आहे.
मयुरी देशमुखची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहे. “तू अगदी बरोबर बोललीस”, अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे. तर एकाने “हे खरं आहे”, असे म्हटले आहे. “अगदी खरंय”, अशी कमेंट एकाने केली आहे.
आणखी वाचा : ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटकाचे प्रयोग अचानक रद्द, कारण उमेश कामतला…
दरम्यान मयुरी देशमुख २० जानेवारी २०१६ रोजी आशुतोष भाकरेशी विवाहबद्ध झाली. आशुतोषने ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. अभिनेता आशुतोष भाकरेने २०२० मध्ये राहत्या घरी आत्महत्या केली होती. लॉकडाउनपूर्वी मयुरीचे ‘तिसरे बादशाह हम’ हे नाटक रंगभूमीवर सुरु होते. मयुरी देशमुख कामाबद्दल बोलायचं तर तिने ‘इमली’ या मालिकेत साकारलेली मालिनी ही भूमिका बरीच गाजली.