कलाकार मंडळी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नवनवीन व्हिडीओ, फोटो आणि परखड मत शेअर करत असतात. अलीकडेच एक मराठमोळी अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली होती. एका फोटोमुळे तिच्या लग्नापर्यंतच्या चर्चा रंगल्या होत्या. यामुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण हे सगळं खोटं होतं. तिच्या आगामी गाण्याच्या प्रमोशनचा हा भाग होता. याच गाण्याच्या दरम्यान या मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर एक भयंकर घटना घडली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा – Video: ‘तान्हाजी’ फेम अभिनेता सहकुटुंब रावसाहेब दानवेंच्या घरी पाहुणचाराला; भेट म्हणून दिली सोन्याची अंगठी, कपडे अन्….

ही अभिनेत्री म्हणजे मीरा जोशी. तिनं काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर केला होता आणि यामुळे ती लवकरच लग्नबंधनात अडकणार या चर्चांना उधाण आलं. पण हा तिच्या नव्या गाण्याचा प्रमोशनचा भाग होता. नुकतंच तिचं ‘माझ्या एकटीचा बॉयफ्रेंड’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. याच गाण्याच्या शूटिंगदरम्यान एक भयंकर घटना घडली. याचा व्हिडीओ मीराने तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.

हेही वाचा – “तुम्ही आता जागे झालात का?” ‘ताली’वरील ‘त्या’ ट्रोल कमेंटवर सुव्रत जोशी स्पष्टच बोलला; म्हणाला, “परदेशात…”

उरणजवळच्या समुद्रात मीराच्या ‘माझ्या एकटीचा बॉयफ्रेंड’ या नव्या गाण्याचा काही भाग शूट करण्यात आला. त्यावेळेस एक मोठी लाट आली आणि मीरासह तिचा सहकलाकार, दिग्दर्शक पाण्यात पडले. हा भयंकर अनुभव मीराने युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.

हेही वाचा – ‘दादा कोंडके, कृष्णाष्टमी आणि जीवनमरणाच्या हिंदोळ्यावर’

दरम्यान, मीराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं तब्बल पाच वर्षानंतर मालिकाविश्वात पुनरागमन केलं आहे. ती सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दार उघड बये’ मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिनं ‘चंपा’ ही भूमिका साकारली आहे.

Story img Loader