मराठमोळी अभिनेत्री लवकरच ‘द फॅमिली मॅन’ व ‘तरला’ यासारख्या चित्रपटात दमदार अभिनयाने मनं जिंकणाऱ्या शारिब हाशमीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तिनेच सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. नुकतीच ‘दार उघड बये’ या मालिकेत झळकलेली मीरा जोशी आता शारिब हाशमीसह काम करणार आहे.
“२०२० मध्ये दरबानमध्ये त्यांचे काम पाहिल्यानंतर मी त्यांचं कौतुक करत मेसेज पाठवला होता. त्यांनीही कृतज्ञतेने व नम्रतेने मला रिप्लाय केला होता. त्यावेळेस मी स्वप्नातही विचार केला नव्हता की एके दिवशी मी त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करेन. तुमच्या अभिनयाबद्दल काय बोलावं! तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे!” अशी पोस्ट मीराने शारिबरोबर एक पोस्ट शेअर करत लिहिली आहे.
मीराच्या या पोस्टवर शारिबने कमेंट करत कौतुकासाठी तिचे आभार मानले. “तुझ्या या शब्दांसाठी धन्यवाद मीरा, तू अप्रतिम आहेस,” असं शारिबने कमेंटमध्ये लिहिलं. दरम्यान, मीराच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तसेच मीराला मिळालेल्या संधीबद्दल चाहते तिचं अभिनंदन करत आहेत.