बिग बॉस मराठीच पहिलं पर्व चांगलंच गाजलं होतं. या पर्वातील प्रत्येक स्पर्धक घराघरात पोहोचले आहेत. त्यामुळे हे स्पर्धक आजही तितकेच लोकप्रिय आहेत. या पर्वाची विजेती मेघा धाडेनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये बिग बॉसच्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणावर आधारित चित्रपटाचं शूटिंग केव्हा सुरू होणार? प्रसाद ओकनं व्हिडीओ केला शेअर

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
Milind Gawali And Teja Devkar
पैसे संपले, अभिनेत्रीला कल्पना न देता निर्माते झाले पसार; नेमकं काय घडलेलं? मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

मेघा धाडे खास मैत्रीण शर्मिष्ठा राऊतबरोबर ‘लोकमत फिल्मी’च्या ‘आपली यारी’ कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी मेघाने बिग बॉसच्या घरातील गमतीजमती सांगितल्या. ती म्हणाली की, “शमाने (शर्मिष्ठ राऊत) बिग बॉस पहिल्या पर्वात ज्या क्षणी पाय ठेवला म्हणजे तिची एन्ट्री एका वेगळ्याच पद्धतीनं झाली होती. बिग बॉसमध्ये आजपर्यंत अशी सस्पेन्स एन्ट्री कोणाची झाली नव्हती. तशी एन्ट्री शर्मिष्ठाची झाली होती. त्यावेळेस माझ्याबरोबर त्या घरात सई, पुष्कर, आऊ वगैरे होते. पण तरीही मला त्या घरात एकट वाटतं होतं. कारण सई आणि पुष्कीची जास्त घनिष्ट घट्ट मैत्री होती. त्यात बिग बॉसच्या घरात माझे हे दोघेचं मित्र होते. त्यावेळेस मला बिग बॉसमध्ये असताना खेळण्यापेक्षा जास्त मैत्री महत्त्वाची वाटत होती. यावेळी मी खूप भावनिक झाली होती.”

हेही वाचा – ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा गश्मीर महाजनी आहे क्रश; म्हणाली…

“एकवेळ अशी आली होती की, खेळण्यावरचं लक्ष्य निघून गेलं होतं. ट्रॉफी वगैरे काही नको, असं झालं होतं. मला मित्र-मैत्रीणी पाहिजे, ते माझ्या जवळच पाहिजे होते, असं झालं होतं. पण हे लक्ष्य पुन्हा केंद्रीत करण्यासाठी मला शर्मिष्ठाची मदत झाली. शमाने मला प्रत्येक रात्र बसून समजावलं होतं. तिचा आणि माझ्यातला संवाद हा माझ्यासाठी मोकळा श्वास होता. ही नसती तर बिग बॉसची ट्रॉफी माझ्या घरात आली नसती,” अशी मेघा म्हणाली.

हेही वाचा – “जिच्या पायाला मी स्पर्श करून…” उत्कर्ष शिंदेची अभिनेत्री हर्षदा खानविलकरसाठी खास पोस्ट, म्हणाला…

दरम्यान, मेघाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर असली तरी राजकारणात सक्रिय झाली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाने मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती केली होती.