प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून मेघा घाडगेला ओळखले जाते. मेघा घाडगे ही बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. त्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. मेघा ही सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेघा घाडगेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने स्वत:ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “मला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना शुभेच्छांसाठी खुप खुप धन्यवाद”, असे तिने म्हटले आहे.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

मेघाने तिचा वाढदिवस रुग्णालयात साजरा केल्याचे फोटोत पाहायला मिळत आहे. यावेळी तिच्या हातावर सलाईन लावल्याचे दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून अनेक कलाकारांनी तिची विचारपूस केली आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरेंच्या लेकीचे मनोरंजनसृष्टीत पदार्पण; पोस्ट शेअर करीत म्हणाले, “पहिलाच प्रोजेक्ट अन्…”

अभिनेत्री अमृता धोंगडेने या पोस्टवर कमेंट केली आहे. तिने “ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा, लवकर बरी हो”, असे म्हटले आहे. तर अनेक चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. मेघा घाडगेच्या या पोस्टनंतर तिला काय झालं, तिला रुग्णालयात का दाखल केलं? याबद्दल चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress megha ghadge admitted in hospital share birthday post with photos nrp
First published on: 11-12-2023 at 16:04 IST