छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं भारतात आणली जाणार आहेत. ती नखं सध्या लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात आहेत. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने ही वाघनखं आणली जाणार आहेत. ही नखं आणण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला गेले आहेत.
३० वर्षांपूर्वी बॉलीवूड सोडणाऱ्या अभिनेत्रीला करायचंय पुनरागमन; म्हणाली, “मी बिकिनी मॉम…”
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मीरा जगन्नाथ सध्या लंडनमध्ये असून तिने तिथल्या रस्त्यावर झळकणाऱ्या बॅनर्सचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. त्या बॅनरवर छत्रपती शिवरायांचा फोटो आहेत. त्याखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे तसेच सुधीर मुनगंटीवार यांचे फोटो दिसत आहेत. त्यावर महाराष्ट्र सरकार व वाघनखं असं लिहिल्याचं दिसत आहे. ‘अभिमानी भारतीय’ म्हणत हा व्हिडीओ शेअर केला आहे.
ही वाघनखं भारतात तीन वर्षांसाठीच आणली जाणार आहेत. “छत्रपती शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात कायमस्वरुपी आणण्यासाठी आम्ही ब्रिटन सरकारला प्रस्ताव दिला आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने शिवरायांशी संबंधित ज्या पवित्र वस्तू आहेत त्या परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पहिल्यांदा ते एक वर्षासाठी म्हणाले होते आता ते तीन वर्षांसाठी देत आहेत. आपला प्रयत्न असा आहे की ती वाघनखं कायमस्वरुपी इथे यावीत. या बदल्यात वाघाची एक जोडी आम्ही तुम्हाला देऊ. वाघनखांबाबत प्राथमिक चर्चेतून निर्णय होईल. छत्रपती शिवरायांची जगदंब तलवारही आणण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत,” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.