मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असते. मिताली ही सध्या बालीमध्ये फिरताना दिसत आहे. नुकतंच मितालीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरील एका कमेंटने लक्ष वेधून घेतले आहे.

मिताली मयेकर ही कायमच फिरताना दिसते. सध्या ती बालीमध्ये गेली आहे. यावेळी तिने समुद्रावर सर्फिंग करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मितालीने बालीच्या समुद्रकिनारी बिकिनी परिधान करून तिने फोटोसाठी विविध पोझ दिल्या होत्या. तिच्या या फोटोशूटवर अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते.
आणखी वाचा : “पार्थ भालेरावचा व्हिसा आला नाही अन्…”, मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “आम्ही १५ दिवस…”

zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स

आता मितालीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती बालीच्या समुद्रकिनारी साडी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर एका चाहत्याने हटके कमेंट केली आहे.

“तुझी जरी काठाची बिकिनी घे… यामुळे कदाचित काही माणसांच्या समस्या सुटतील”, अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर मिताली मयेकरने “बिकिनीवरती जरतारीचा मोर नाचरा हवा!” असे म्हटले आहे.

mitali mayekar
मिताली मयेकर

आणखी वाचा : “आपल्याकडे मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी…” ललित प्रभाकरने ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या निमित्ताने व्यक्त केली खंत, म्हणाला “तुम्हाला एका पैशाचा…”

दरम्यान मितालीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. या व्हिडीओवरील बऱ्याच कमेंट्सला मितालीने जशाच तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे.

Story img Loader