सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या मिताली व सिद्धार्थ स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. स्पेन ट्रीपचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्पेन ट्रिपमधील एक खास फोटो नुकताच शेअर केला आहे. मितालीने बिकिनी परिधान करत समुद्रकिनारी फोटोसाठी पोझ दिली आहे. या फोटोमधील मितालीचा हॉट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. मितालीने बिकिनीतील बोल्ड फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा>> ‘द केरला स्टोरी’ चित्रपटासाठी अदा शर्माने आकारली मोठी रक्कम, ‘इतक्या’ कोटींचं घेतलं मानधन
बिकिनीतील फोटो शेअर करत मितालीने पोस्ट लिहिली आहे. “आज सकाळी उठून मी कॉन्ट्रोव्हर्सीला निवडलं. कमेंट सेक्शनमध्ये आपली संस्कृती याबाबत ज्ञान देण्याता प्रयत्न करू नका. तुम्हाला स्वत:ची लाज वाटेल,” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. मितालीच्या या फोटोवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
मिताली तिच्या पोस्टमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. याआधी तिने अंघोळ करतानाचा फोटो शेअर केला होता. मितालीचा तो फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं.