अनेक मराठी अभिनेत्री आहेत ज्यांनी मनोरंजन सृष्टीला रामराम करत परदेशात स्थायिक झाल्या आहेत. एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्री सध्या त्यांचं वैयक्तिक आयुष्य परदेशात एन्जॉय करत आहेत. पण तरीही या अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असतात. अनेक फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असतात. या मराठी अभिनेत्री अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशी एक अभिनेत्री आहे म्हणजे मृणाल दुसानिस.

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ अशा मालिकेतून मृणाल दुसानिस घराघरात पोहोचली. तिने साकारलेली शमिका असो, मंजिरी असो किंवा अनुश्री तिची प्रत्येक भूमिका हिट ठरली. त्यामुळे मृणाल मनोरंजन सृष्टीपासून दूर असली तरी प्रेक्षकांच्या मनात मात्र कायम आहे. अशी ही लोकप्रिय अभिनेत्री चार वर्षांनंतर अमेरिकेहून भारतात परतली आहे. यासंबंधित तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Marathi Actress Deepali Sayed new hotel
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं नव्या क्षेत्रात पदार्पण! शिर्डीत भाविकांसाठी सुरू केलं हॉटेल, अनेक राजकीय मान्यवरांनी दिली भेट
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार

हेही वाचा – Video: पृथ्वीक प्रतापने शेअर केला प्राजक्ता माळीबरोबर ऑस्ट्रेलियातून व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “मग कर्जतचं फार्म हाऊस…”

गोदावरीच्या काठेवरील कुटुंबियांसहचे फोटो शेअर करत मृणालने लिहिलं आहे, “अखेर चार वर्षांनंतर मी परतले. मी जिथे बसली आहे, ते माझं मूळ गावं आहे. माझं नाशिक, गोदाघाट.” अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा पती नीरज मोरे आणि लेक नुर्वी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: अरिजीत सिंहला प्रत्यक्षात पाहून भारावली रिंकू राजगुरू, महेश मांजरेकरांच्या लेकीसह पोहोचली होती लाइव्ह कॉन्सर्टला

दरम्यान, २०१६ साली मृणालने नीरज मोरे याच्याशी लग्नगाठ बांधली. नीरज हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. लग्नानंतर मृणालने काही वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. पण नंतर तिने २०१८मध्ये ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून पुनरागमन केलं. त्यानंतर २४ मार्च २०२२मध्ये मृणालला मुलगी झाली. सध्या मृणाल ही मनोरंजन सृष्टीपासून दूर राहून वैयक्तिक आयुष्य एन्जॉय करत आहे.

Story img Loader