Mrunal Dusanis New Serial : चार वर्षांनंतर अभिनेत्री मृणाल दुसानिस छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत मृणाल झळकणार आहे. अभिनेता विजय आंदळकर, विवेक सांगळे, ज्ञानदा रामतीर्थकर, कश्मिरा कुलकर्णी अशा तगड्या कलाकार मंडळीबरोबर मृणाल जबरदस्त पुनरागमन करत आहे. ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेची घोषणा १ सप्टेंबरला ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ या कार्यक्रमात होणार आहे. तत्पूर्वी मृणाल तिच्या नव्या मालिकेविषयी आणि भूमिकेबद्दल काय म्हणाली? जाणून घ्या…
अभिनेत्री मृणाल दुसानिसने ( Mrunal Dusanis ) ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना नव्या मालिकेविषयी सांगितलं. तिला विचारलं की, बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा काम मिळालं. कसं वाटतंय? मृणाल म्हणाली, “खूप खूप छान वाटतंय. बाप्पाच्या आगमनातच आमच्या प्रोजेक्टची सुरुवात होतेय. त्यामुळे खूप उत्सुक आहे आणि आशावादी आहे.”
पुढे नव्या मालिकेविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली की, मालिका नवीन आहे. स्पेशल काय आहे? मालिका कशी आहे? मालिकेच्या टीममध्ये कोण-कोण आहे? हे सगळं तुम्हाला लवकरच कळेल. त्यासाठी तुम्हाला ‘स्टार प्रवाह’चा ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ कार्यक्रम बघावा लागेल. त्या कार्यक्रमात आमच्या मालिकेच्या टीमचा खुलासा होत आहे. पण मालिकेचं नाव काय असणार आहे? भूमिका काय आहेत? हे सध्या आम्ही गुपित ठेवलं आहे.
आमची मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा – मृणाल दुसानिस
चार वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परताना ‘स्टार प्रवाह’ची मालिका वाट्याला येतेय. त्याविषयी मृणाल ( Mrunal Dusanis ) म्हणाली, “खरं सांगू का मी खूप कृतज्ञ आहे. मला खूप छान वाटतंय मी चांगल्या लोकांच्या भोवती आहे. मला ‘स्टार प्रवाह’च्या परिवाराचा भाग व्हायची संधी मिळतेय. मला खरंच खूप छान वाटतंय. कारण तुम्ही बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा काम सुरू करत असता तेव्हा ते धमाकेदार आणि जोरदार असणं अपेक्षित आहे. यासाठी मला काही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीत. चॅनलनेच अर्ध काम माझं पूर्ण केलं आहे. माझी टीम खूप छान आहे. सगळेच हुशार आहेत. सगळे प्रेक्षकांना नक्की आवडतील आणि आमची मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.”
हेही वाचा – नवरी मिळे हिटलरला : लीला फोडणार दहीहंडी, पाहायला मिळणार अभिरामबरोबरचा रोमँटिक क्षण
पुढे नव्या मालिकेतील भूमिकेविषयी विचारलं असता मृणाला म्हणाली की, मला भूमिकेविषयी असं सांगता येणार नाही. कारण मी थोडी जरी हिंट दिली तर सगळंच समजेल. त्यामुळे थोडीशी वाट बघायला काहीच हरकत नाही. त्यानंतर यंदा बाप्पाकडे काय मागशील, असा प्रश्न मृणालला ( Mrunal Dusanis ) विचारला. तेव्हा ती म्हणाली, “बाप्पाकडे मी काहीच मागत नाही. जे काही घडतंय त्यासाठी ताकद मला दे. जेणेकरून मी ते छान करू शकेन. एवढंच मी सांगेन.”