‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस सध्या खूप चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी मृणाल भारतात परतली. चार वर्षांनंतर अभिनेत्री आपल्या कुटुंबीयांंसह भारतात आली आहे. यासंबंधित तिने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांनी ही आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून चाहते तिला पुन्हा मालिकेत किंवा चित्रपटातून पाहायला मिळणार का? असे अनेक प्रश्न विचारत आहेत. आता यावर मृणालने स्वतः उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजवर अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने साकारलेली प्रत्येक भूमिका हिट झाली आहे. मग ती शमिका असो, मंजिरी असो किंवा अनुश्री तिच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. मृणालने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे तिला पुन्हा एकदा नवीन प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

हेही वाचा – ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘त्या’ बसवर सचिन पिळगांवकरांनी ‘इतका’ केला होता खर्च, जयवंत वाडकरांनी केला खुलासा

भारतात परतल्यानंतर नुकताच मृणालने ‘एबीपी माझा’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. तेव्हा ती म्हणाली, “चार वर्षांनी मी नवरा व लेकीसह मायदेशी परतली आहे आणि खूप छान वाटतं आहे. आता मी भारतात राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझी लेक नुर्वी पहिल्यांदा नाशिकला आली असून तिला संपूर्ण नाशिक फिरवताना खूप मजा आली.”

पुन्हा मनोरंजनसृष्टीत कमबॅक करण्याविषयी मृणाल म्हणाली, “मला आता पुन्हा काम सुरू करायचं आहे. प्रेक्षक मला आगामी कामाबाबत विचारणा करत आहेत. त्यामुळे मी आता चांगल्या संधीची वाट पाहत आहे. माझी चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा आहे. याशिवाय मला नाटकातही काम करायला आवडेल. याआधी प्रायोगिक नाटकात काम केलं असून आता मला व्यावसायिक नाटकात काम करण्याची इच्छा आहे.”

हेही वाचा – Video: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नेत्रा व रुपालीने दिल्या अनोख्या अंदाजात होळीच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

दरम्यान, २०१६ साली मृणालने नीरज मोरे याच्याशी लग्नगाठ बांधली. नीरज हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो अमेरिकेत राहतो. त्यामुळे लग्नानंतर मृणालने काही वर्षांसाठी मनोरंजनसृष्टीतून ब्रेक घेतला. पण तिने २०१८मध्ये ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून कमबॅक केलं. त्यानंतर २४ मार्च २०२२मध्ये मृणालला मुलगी झाली. तेव्हापासून ती मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. त्यामुळे मृणालच्या कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress mrunal dusanis will comeback in entertainment industry pps