मराठी कलाकार अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक विषयांवर आपली मतं मांडत असतात. ‘आई कुठे काय करते’, ‘अजूनही बरसात आहे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘श्रीमंत घरची सून’ अशा गाजलेल्या मालिकांच्या लेखिका तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी शेअर केलेली अशीच एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रसिद्ध अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले यांनी फेसबुकवर त्या राहत परिसरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. “रोज सकाळी आमच्या आजूबाजूला कचरा जाळतात. कित्येक तास तो धूर नाकात, घशात जाणवत राहतो. अनेक सोसायट्याच कचरा उचलणाऱ्या माणसांना ‘इथेच जाळून टाका ‘ असं सांगतात म्हणे. म्हणजे आता याबद्दलही तक्रार करणं आलं. पण हा काय आळस आहे? का दुर्लक्ष, का कामचुकारपणा? आणि असला तर कुणाचा?” असा संतप्त सवाल अभिनेत्रीने तिच्या पोस्टमधून उपस्थित केला आहे.

हेही वाचा : संदीप पाठकसह ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री झळकणार कलर्स मराठीच्या नव्या मालिकेत! प्रोमो पाहिलात का?

मुग्धा गोडबोले संबंधित व्हिडीओ शेअर करत लिहितात, “याचविषयी काल लिहिलं होतं. मी या लोकांना पोलिसांत तक्रार करेन असं म्हणाले आहे… यावर यांचं म्हणणं आहे की, पालापाचोळा उचलायला एवढ्या आत गाडी येत नाही. आम्हाला पायी चालत लांबवर हे न्यावं लागतं. यावर काय उपाय असतो? या बायकांची दयाही येते. पण त्या जे करतायत तेही चुकीचं आहे.”

हेही वाचा : गोव्याहून मुंबईत आल्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी राहायच्या वर्षा उसगावकर; म्हणाल्या, “त्यांचा स्वभाव फार…”

दरम्यान, मुग्धा गोडबोले यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने यावर, “कचरा, पानं जाळायला परवानगी नसते. अर्थात कोणी ऐकत नाही. पण सतत धुमसणाऱ्या या धुराचा खूप त्रास होत राहतो” अशी कमेंट केली आहे. तर, आणखी काही युजर्सनी याबाबत “महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करा” असा सल्ला अभिनेत्रीला दिला आहे.