गेल्या काही महिन्यांपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील कोणती ना कोणती मालिका ऑफ एअर होताना दिसत आहे. तीन, चार आणि पाच महिन्यांनी नव्या मालिकांचा गाशा गुंडाळला जात आहे. पण अशातच तग धरून ‘इंद्रायणी’ मालिका आहे. छोट्या इंदूची गोष्ट प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे ‘इंद्रायणी’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याआधी ‘इंद्रायणी’ मालिकेत काही पाहुणे कलाकार पाहायला मिळाले. अभिनेता संतोष जुवेकर, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेली इरिना रुडाकोवा हे पाहुणे कलाकार म्हणून झळकले होते. त्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका मुक्ता बर्वेची ‘इंद्रायणी’ मालिकेत जबरदस्त एन्ट्री झाली आहे.

हेही वाचा – Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘भूल भुलैया ३’ ‘सिंघम अगेन’ चित्रपटावर झाला वरचढ, तिसऱ्या शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रुद्रम’, ‘अजूनही बरसात आहे’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांनंतर मुक्ता बर्वे ‘इंद्रायणी’ मालिकेत झळकली आहे. आनंदीबाईंच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी या नव्या पाहुणीची एन्ट्री झाली आहे. याच निमित्ताने मुक्ताने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

‘इंद्रायणी’ मालिकेतील व्हिडीओ शेअर करत मुक्ताने लिहिलं आहे, “कितीतरी दिवसांनी माझ्या जुन्या टीमबरोबर काम करायला मिळालं आणि एकदम फ्रेश झाले. ‘रुद्रम’नंतर @potadientertainment बरोबर काम करण्याचा योग आलाच नव्हता. कलर्समुळे, ‘इंद्रायणी’मुळे हा योग पुन्हा जुळुन आला. माझा लाडका मित्र आणि आवडता दिग्दर्शक विनोद लवेकर, तुझ्याबरोबर काम करताना किती छान वाटतं रे. काम संपलं की नेहमी वाटतं अजून थोडं जास्त काम हवं होतं.”

“सगळं जुनं मित्रमंडळ निखिल, नितिन, शिवा जी, सँडी, विशाल भेटले. फ्रेश वाटलं. माझी आवडती अनिता दाते भेटली. तिच्याबरोबर थोडं काम करता आलं, धमाल आली. संदीप पाठक तुला मिस केलं. इंद्रायणीची सगळी टीम. सगळे कलाकार , विशेष म्हणजे सांची भोईर म्हणजे छोटीशी इंद्रायणी किती सहज सुंदर काम करतेस. ज्यांची ज्यांची कामं फक्त बघत होते त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करता आलं. फार छान वाटलं. धन्यवाद. खूप प्रेम,” असं मुक्ता बर्वेने लिहिलं आहे.

हेही वाचा – लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू

हेही वाचा – Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”

दरम्यान, ‘कलर्स मराठी’वरील काही मालिका बंद होत असल्या तरी नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘अशोक मा.मा.’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या दोन नव्या मालिका लवकरच सुरू होणार आहे. ‘अशोक मा.मा.’ मालिका २५ नोव्हेंबरपासून रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार आहे. तर ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिका २५ नोव्हेंबरपासून ७.३० वाजता पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress mukta barve special post after appearing in indrayani serial pps