काही महिन्यांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. तब्बल साडे तीन वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात पोहोचला होता. अंजी, पशा, सूर्या, सरू, वैभ्या, अवनी, ओंकार या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक घर निर्माण केलं होतं. त्यामुळे या भूमिकांविषयी अजूनही बोललं जात. अशात आता या मालिकेतील सरू म्हणजेच अभिनेत्री नंदिता पाटकरनं चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
हेही वाचा – अभिनेत्री ईशा केसकर दिसणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत? ‘या’ कारणामुळे चर्चांना उधाण
अभिनेत्री नंदिता पाटकरची ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. पण मालिका संपल्यानंतर नंदिता कोणत्या नव्या भूमिकेत पाहायला मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहीलं होतं. अशातच नंदिताने तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.
हेही वाचा – “मी सात महिने घरी बसलेलो, कारण सुबोध भावे…”, चिन्मय मांडलेकरनं सांगितला ‘तो’ किस्सा
नंदिताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी दिली असून लवकरच ती नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘बटर चिकन’ या लघुपटात ती झळकणार आहे. सुमन असं तिच्या भूमिकेचं नाव आहे. या लघुपटाच्या टीझरचा व्हिडीओ पोस्ट करत नंदिताने लिहीलं आहे की, “घेऊन येतोय एक सिक्रेट रेसिपी टू रिलेशन…’बटर चिकन’.”
हेही वाचा – Video: ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर अशोक सराफ झाले भावुक; नक्की काय घडलं? पाहा
नंदिनाची ही पोस्ट पाहून कलाकार मंडळीसह चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. “आम्ही वाटत पाहतोय,” असं चाहत्यांनी प्रतिक्रियेत लिहीलं आहे. ‘बटर चिकन’ या लघुपटात नंदिताबरोबर अभिनेता सुशील इनामदार पाहायला मिळणार आहे. १५ सप्टेंबरला हा लघुपट पॉकेट फिल्म्स या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.