नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे नीलम शिर्के. कॉलेजपासून अभिनयाची ओढ असणारी नीलम शिर्केने एकेकाळी मराठी मालिकाविश्व गाजवलं. ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘चारचौघी’ या मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘पछाडलेला’ चित्रपटातील नीलमने साकारलेली सोनिया अजूनही मराठी रसिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अशी ही हरहुन्नरी अभिनेत्री इंडस्ट्रीत टॉपला असताना अचानक गायब झाली. यामागचं नेमकं कारण काय? ती सध्या काय करते? याचा खुलासा नीलमने स्वतः एका मुलाखतीमधून केला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नीलम शिर्केने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीच्या सुरुवातीला तिने प्रेक्षकांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. नीलम म्हणाली, “मी अभिनय क्षेत्रापासून लांब नाही गेले. तिथेच आहे. अभिनेत्री म्हणून नक्कीच पूर्णपणे वीआरएस घेतली आहे. पण प्रोडक्शन चालू आहे. प्रोडक्शनचे कार्यक्रम सुरू आहेत. काही माहितीपूर्ण कार्यक्रम आम्ही शूट करत असतो. त्याच्यावरती पूर्ण टीम काम करतेय. मी सध्या प्रुफ एडिटर म्हणून अस्मी प्रोडक्शन असं छान एंटरटेनमेंट कंपनी चालवतेय. मी फार निवडक गोष्टी करणारी व्यक्ती आहे. माझ्या भूमिका बघशील तर मी आतापर्यंत जे काही काम करत आले ते मनापासून करत आले. त्यामुळे कदाचित मला जे काम नाही आवडलं ते मी कधीच केलं नाही. अशा वेळी ठरवलं होतं, जेव्हा खूप छान टॉपला जाईन ना; त्यावेळी माझ्याकडे तुम्हाला कुठली भूमिका करायला आवडेल? असा प्रश्न विचारला जाईल. त्यावेळेस आपण वीआरएस घ्यायची. कारण मी अभिनयाची सुरुवात कॉलेजपासून केली होती. म्हणजे कॉलेज विश्व एन्जॉय करायला असं मिळालं नाही.”

neelam shirke opens about healthy competition with aditi sarangdhar
“आमच्यात टक्कर नक्कीच होती, पण…”, अदिती सारंगधरबद्दल नीलम शिर्के काय म्हणाली? सांगितला ‘असंभव’ मालिकेचा किस्सा
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
george soros loksatta editorial
अग्रलेख : ‘परदेशी हाता’चे भूत!
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर

हेही वाचा – Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

पुढे नीलम शिर्के म्हणाली की, मी सायन्सची विद्यार्थी होते. यावेळी एकांकिका केल्या. तेव्हा मला एकांकिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे नऊ पुरस्कार मिळाले. त्याच्यानंतर ती एकांकिका नाटकात रुपांतर झाली. नाटकाचे चार प्रयोग होत नाहीत तोवर पहिली मालिका मिळाली. म्हणजे त्या वर्षभरात इतकं सुरू झालं की, मागे वळून बघितलंच नाही. देवाच्या कृपेने छानच झालं, अजूनही छानच आहे. असं असताना कॉलेज लाइफ एन्जॉय करता आलं नाही. काही छंद होते. बरंच काही करायचं होतं आणि ते सगळंच राहून गेलं. त्यामुळे जे राहून गेलेलं विश्व आहे, ते पूर्ण कधी करायचं. जे राहून गेलेले छंद आहेत, ते कधी पूर्ण करणार. त्यावेळी माझी शिफ्ट ७२ तासांची असायची. एका सेटवरून दुसऱ्या सेटवर, तिसऱ्या सेटवर असं काम असायचं. एक वेगळी झिंग होती.

हेही वाचा – “बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…

हेही वाचा – ‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”

आयुष्य हे खूप सुंदर आहे – नीलम शिर्के

“मला असं वाटतं, त्यावेळेसच आणि यावेळेसच यात खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यावेळी आम्ही एकतर स्पर्धक म्हणून कधीच काम केलं नाही. मित्र-मैत्रीणी म्हणून काम केलं. आपल्या वाट्याला आलेली भूमिका किती उत्कृष्टरित्या आपण वटवू आणि त्यातून काय नवीन होईल. आपला सीन संपलाय तर मॉनिटर समोर बसून आपली मंडळी चुकतायत तर त्याला हे असं नको तसं कर, ही त्यावेळेची सांगण्याची पद्धत होती. पण हे सगळं करत असताना जे वैयक्तिक आयुष्यात करायचं होतं, ते कुठेतरी सतत आठवत होतं. म्हणून मला वीआरएस घ्यायची होती. छान, टॉपला गेल्यावरती लोकांना असं परत वाटलं पाहिजे, ही अभिनेत्री परत कधी येणार, त्यामुळे ती वीआरएस घेतली गेली. पण अभिनय आणि रंगमंचापासूनचं नातं कलाकाराने कितीही तोडायचा प्रयत्न केला तरीही तोडू शकत नाही. त्यामुळे प्रोडक्शन चालू आहे. मी वीआरएस घेऊन माझे सगळे छंद आणि मला जे-जे काही करायचं राहिलं होतं, ते करतेय. आयुष्य हे खूप सुंदर आहे, हा माझा हेतू आहे. मी खूप एन्जॉय करतेय,” असं स्पष्ट नीलम शिर्के म्हणाली.

Story img Loader