मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा आज वाढदिवस आहे. मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्या सध्या मराठी मालिकांमध्ये काम करताना दिसत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेमध्ये निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना खास सरप्राईज मिळालं.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच साताऱ्यात पोहोचलेल्या किरण मानेंची जंगी मिरवणूक, म्हणाले, “डोळ्यांत पाणी…”
निवेदिता सराफ यांचा व्हिडीओ व्हायरल
निवेदिता सराफ यांचा हा ६०वा वाढदिवस आहे. याचनिमित्त त्यांना त्यांच्या टीमने खास सरप्राईज दिलं. निवेदिता जेव्हा ‘भाग्य दिले तू मला’च्या सेटवर पोहोचल्या तेव्हा त्यांचा मेकअपरुम सजवण्यात आला. हे पाहून त्या अगदी भावूक झाल्या. यादरम्यानचा व्हिडीओ निवेदिता सराफ यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
निवेदिता सराफ म्हणाल्या, “काल आमचं पॅकअप उशीराने झालं. तरीही माझ्या टीमने आज वाढदिवसानिमित्त माझी मेकअपरुम सजवली. हे पाहून मी आश्चर्यचकित झाले. त्यांनी हे अगदी उत्तम काम केलं. हा माझ्यासाठी भावनिक क्षण होता. मी भारावून गेले होते.”
आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”
“संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. नंदिनी वैद्य तुमचे विशेष आभार.” असं म्हणते निवेदिता यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून निवेदिता सराफ यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.