मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ या सध्या कलर्स वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. निवेदिता यांचा आज वाढदिवस आहे. मालिका, चित्रपट यातून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘माझा छकुला’, ‘देऊळ बंद’ अशा हिट चित्रपटात त्या झळकल्या. ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. पण अशोक सराफ यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीत काम करणं बंद केलं. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी हा निर्णय का घेतला? याबद्दल खुलासा केला होता.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या जोडीला ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रिनवरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. त्यांच्या वयामध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे. मात्र त्यांच्या प्रेमात वयाचा अडसर कधीच आला नाही. अशोक सराफ यांनी १९९० मध्ये लग्नगाठ बांधली होती. पण त्यानंतर त्या चित्रपटसृष्टीतून गायब झाल्या. त्यांनी जाणीवपूर्वक घरी राहणं पसंत केलं. त्यांनी हा निर्णय का घेतला, याचा खुलासा त्यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत केला होता.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

निवेदिता सराफ काय म्हणाल्या?

“मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी आई कामाला जायची. त्यामुळे जेव्हा मी घरी यायचे तेव्हा आई घरी नसायची. वडिलांच्या निधनानंतर आईला कामाला जाणं भाग होतं. तिच्याकडे पर्याय नव्हता. तिच्यावर माझी आणि माझ्या बहिणीच्या पालनपोषणाची जबाबदारी होती. पण त्यामुळे तिला घरात फार वेळ द्यायला मिळत नव्हता. ज्या दिवशी तिला सुट्टी असायची तेव्हा मी खूप खुश असायची. कारण मला कुलूप खोलून घरात जावं लागणार नाही तेव्हा आई घरी असेल. मला तेव्हा आई हवी असायची, पण काही करू शकत नव्हतो.

त्यावेळी तिच्याकडे पर्याय नव्हता. पण माझ्याकडे होता. मी लग्न केल्यावर ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी गरोदर होते, तेव्हा मी शूटिंग थांबवलं. मी माझ्या आईसाठी जी भावना अनुभवली आहे, तिच भावना माझ्या मुलांनी अनुभवायला नको, असे मला वाटत होते. माझ्या मुलाबरोबर एक पालक असायलाच हवा, असे मला वाटत होते.

त्याकाळी अशोक कायम चित्रीकरणात व्यग्र होता. त्याला फार कमी वेळ मिळायचा. त्यामुळे मी तो निर्णय घेतला. अभिनय ही माझी आवड होती. गरज नव्हती. माझ्या आवडीसाठी मला माझ्या मुलांचं सुख हिरावून घ्यायचे नव्हते. त्यामुळेच मी थोडा ब्रेक घेतला”, असे निवेदिता सराफ म्हणाल्या.

दरम्यान लग्नानंतर निवेदिता सराफ यांनी अभिनयातून ब्रेक घेतला. त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत सराफ याच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली. निवेदिता आणि अशोक यांना अनिकेत नावाचा मुलगा आहे. तो एक उत्कृष्ट शेफ आहे.

Story img Loader