छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून पल्लवी पाटीलला ओळखले जाते. ‘रुंजी’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. ती कायमच तिच्या मालिकांसह खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकतंच पल्लवीने तिच्या आयुष्यात आलेल्या तिच्या एक्ससाठी एक सल्ला दिला आहे.
पल्लवी पाटीलने नुकतंच प्लॅनेट मराठीवरील त्या नंतर सगळं काही बदलल या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने तिचे आई-वडील, तिचे बालपण, आयुष्यात आलेले अनेक उतार-चढाव, हिंदी सिनेसृष्टीतील काम याबद्दल भाष्य केले. यावेळी तिला तिच्या एक्सला काय सल्ला देशील असे विचारण्यात आले. यावर तिने फारच स्पष्टपणे सल्ला दिला.
आणखी वाचा : “…म्हणून मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितलं घटस्फोटामागचे खरं कारण, म्हणाली “माझ्या आई-वडिलांना…”
“माझा सगळ्या एक्ससाठी माझा एक निरोप आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी खूप मोठी झाले. मी खूप शिकले. माझा तुमच्याबरोबरचा जो काही काळ, जेवढा केवढा होता, तो खूप छान होता.
परिस्थितीमुळे, काही घटनांमुळे किंवा स्वभावामुळे आपलं नाही जमलं. पण मला माहितीये की, तुम्ही सर्व छान आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यात मस्त आहात. जर कधीतरी नशिबानं ठरवलं आणि तुम्ही पटकन समोर आलात तर हाय, हॅलो म्हणून पुढे जाऊ”, असे पल्लवी पाटील म्हणाली.
आणखी वाचा : “किंडर जॉय शरीरासाठी घातक…” संकर्षण कऱ्हाडेच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांनी दिला सल्ला
दरम्यान पल्लवी पाटीलने अभिनेता संग्राम समेळबरोबर लग्नगाठ बांधली. २०१६ मध्ये त्या दोघांनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. पण त्या दोघांचेही नातं फार काळ टिकलं नाही. त्या दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पल्लवी पाटीलनं ‘बापमाणूस’, ‘रुंजी’, ‘अग्निहोत्र 2’ अशा मालिकांमधून आपला ठसा उमटवला आहे. काही महिन्यांपूर्वी ती ‘वैदही’ या मालिकेतही झळकली होती.