Pooja Sawant First Makar Sankranti: मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत नेहमी चर्चेत असते. तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ सातत्याने व्हायरल होतं असतात. काही दिवसांपूर्वी पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियातील घराचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पूजा आपल्या आई-वडिलांना पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातलं प्रशस्त घर दाखवताना दिसली होती. त्यानंतर आता पूजा लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीच्या तयारीला लागली आहे. यासंदर्भात तिने नुकताच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.
गेल्यावर्षी २८ फेब्रुवारीला पूजा सावंतने ( Pooja Sawant ) लग्नगाठ बांधली. ती सिद्धेश चव्हाणशी लग्नबंधनात अडकली. त्यामुळे सध्या पूजा वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. पूजाचा नवरा सिद्धेश हा ऑस्ट्रेलियातील एक फायनान्स कंपनीत कामाला आहे. त्यामुळे अभिनेत्री कधी ऑस्ट्रेलियात तर कधी मुंबईत असते. आता पूजा मकरसंक्रांतीच्या तयारीला लागली आहे. लग्नानंतरची पूजाची ही पहिलीच मकरसंक्रांत आहे.
हेही वाचा – Bigg Boss 18: रजत दलालच्या चुकीमुळे ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
पूजा सावंतने ( Pooja Sawant ) इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करून मकरसंक्रांतीच्या तयारीला लागल्याचं सांगितलं आहे. तिने हलव्याच्या दागिन्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर तिने लिहिलं आहे की, वेध…पहिल्या मकरसंक्रांतीचे. या व्हिडीओनंतर तिने हलव्याच्या मंगळसूत्राचा फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा – तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील टॉप-९ सदस्यांमध्ये कोण आहे सर्वाधिक श्रीमंत? जाणून घ्या संपत्ती
दरम्यान, पूजा सावंतच्या ( Pooja Sawant ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती काही महिन्यांपूर्वी ‘मुसाफिरा’ चित्रपटात पाहायला मिळाली होती. पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’मध्ये तिने मेघाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात पूजासह पुष्कर जोग, स्मृती सिन्हा, पुष्कराज चिरपुटकर, दिशा परदेशी झळकले होते. त्यानंतर पूजा ‘क्रॅक’ चित्रपटातील एका गाण्यात विद्युत जामवालबरोबर डान्स करताना दिसली. मग पूजाचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांसाठी ती ऑस्ट्रेलियात राहत होती. पण ती पुन्हा मुंबईत परतली. त्यानंतर पूजा सावंतचं ‘नाच गो बया’ गाणं ५ जुलैला प्रदर्शित झालं. तिचं हे गाणं सुपरहिट झालं. आता पूजा कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे.