झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. अज्याचं फौजी होण्यापर्यंतचा प्रवास आणि शितलीबरोबरचं लग्न यामुळे ही मालिका चागंलीच रंगली. या मालिकेमुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री पूर्वा शिंदे. ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत पूर्वाने जयडी हे पात्र साकारले होते. सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे.
पूर्वा शिंदे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच पूर्वाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती स्विमिंगपूलचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी तिने स्विमसूट परिधान केला आहे. त्याबरोरबच तिने गॉगलही लावला आहे.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”
या व्हिडीओत पूर्वा ही अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर पोहोण्याचा आनंद घेताना दिसत आहे. “मुझमे नयी बात है, नए आदतों के साथ है”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.
पूर्वा ही सध्या लोणावळ्यात सुट्टया एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी तिने तिचे अनेक बोल्ड आणि हॉट लूकमधील व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तिच्या या व्हिडीओवर अनेक कलाकार आणि चाहते कमेंट करताना दिसत आहेत.
दरम्यान पूर्वाने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. ती उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक सुंदर नृत्यांगनादेखील आहे. काही दिवसांपूर्वी पूर्वाने जीव माझा गुंतला या मालिकेत खलनायक पात्र साकारले होते. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत असलेल्या अंतराच्या बहिणीचे म्हणजेच श्वेताचे पात्र साकारले होते.