मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्राजक्ता गायकवाडला ओळखले जाते. तिने आतापर्यंत विविध मालिकांमध्ये काम केले आहे. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. नुकतंच प्राजक्ताने मंगळागौरीचा आनंद लुटला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानंतर मंगळागौरची क्रेझ प्रचंड वाढली आहे. हल्ली अनेक ठिकाणी मंगळागौरीच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतंच या एका कार्यक्रमाला अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने हजेरी लावली आहे. याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “१० वर्षांपूर्वी घराची नोंदणी केली, पण…”, शशांक केतकरची मोठी फसवणूक; म्हणाला “बिल्डरला…”

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओत ती फुगड्या खेळताना दिसत आहे. त्याबरोबरच तिने इतर विविध खेळ खेण्याचाही आनंद यावेळी लुटला. या व्हिडीओला तिने हटके कॅप्शनही दिले आहे. “श्रावण महिना म्हटल्यानंतर मंगळागौर तर आलीच….”, असे प्राजक्ता गायकवाडने म्हटले आहे.

आणखी वाचा : प्राजक्ता गायकवाडने दिली गुडन्यूज, पदवी परीक्षेत मिळाले इतके गुण

दरम्यान श्रावणात केले जाणारे मंगळागौरीचे व्रत म्हणजे नवविवाहितेसाठी उत्साहाची, आनंदाची पर्वणीच असते. समवयस्क मैत्रिणींना, नातेवाईकांना जमवणे, पूजेचे विधी, गाणी, वेगवेगळे खेळ, थट्टामस्करी, खाणेपिणे, मैत्रिणींबरोबर जागरण करणे, अशा विविध गोष्टी यावेळी केल्या जातात. सध्या सर्व कलाकारांमध्ये मंगळागौरीची क्रेझ पाहायला मिळत आहे.