‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरांत पोहोचली. या मालिकेमध्ये तिने साकारलेली महाराणी येसूबाई ही भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. प्राजक्ता आता पुन्हा हिच ऐतिहासिक भूमिका जगत आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांच्याबरोबर प्राजक्ता ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य करत आहे. यादरम्यानचाच प्राजक्तताचा एका हॉटेलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “घाणेरडं कंबरे खालचं लिहायचं आणि…” कोणावर भडकले शरद पोंक्षे? शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्राजक्ता ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यनिमित्त नाशिकला पोहोचली होती. यावेळी तिने नाशिकच्या ‘साधना मिसळ’ला भेट दिली. प्राजक्ताने चक्क त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांबरोबर भाकऱ्या करण्यास सुरुवात केली. तिच्यासाठी हा एक सुंदर अनुभव होता.

प्राजक्ताने पहिल्यांदाच भाकरी केली. तिचा भाकरी करण्याचा प्रयत्नही यशस्वी ठरला. तिने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “नाशिकची सुप्रसिद्ध ‘साधना मिसळ’ला भेट दिली. त्यावेळी भाकरी करण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी ठरला. भाकरी जमली. पहिल्यांदाच भाकरी केली आहे.”

आणखी वाचा – देशमुखांची सून झाल्यानंतर पिठलं-भाकरी आवडीने खाते जिनिलीया, पण स्वतः जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही कारण…

हा व्हिडीओ पाहून प्राजक्ताच्या साधेपणाचं नेटकरी कौतुक करत आहेत. खूप छान ताई, तुमचा साधेपणा अधिक आवडला, एवढी मोठी अभिनेत्री असून गर्व नाही अशा अनेक कौतुकास्पद कमेंट प्राजक्ताच्या चाहत्यांनी केल्या आहेत. प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहे.