छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव म्हणजे प्राजक्ता गायकवाड. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. सध्या ती ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये काम करत आहे. पण आता ती एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राजक्ता गायकवाड ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे दिसत आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”

प्राजक्ताने नुकतंच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याला भेट दिली. यावेळी तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ दिले. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर ग्रेट भेट”, असे कॅप्शन प्राजक्ता गायकवाडने या फोटोला दिले आहे.

तिने हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. प्राजक्ताच्या या फोटोवर अनेकांनी “भावी आमदार” असे म्हटले आहे. त्यातील एका कमेंटवर प्राजक्ताने हसण्याचा इमोजी पोस्ट करत रिप्लाय केला आहे. तर काहींनी तिला “ताई राजकारणात जावू नका”, असा सल्ला दिला आहे.

प्राजक्ता गायकवाडची कमेंट

आणखी वाचा : “तुम्ही लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला का?” उर्मिला मातोंडकर म्हणाल्या “माझ्या नवऱ्याने…”

दरम्यान प्राजक्ता ही अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये झळकताना दिसत आहे. लवकरच ती एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. काही आठवड्यांपूर्वी ती हैदराबाद इथं शूटिंगला गेली होती. तिने या चित्रीकरणावेळी नारळ फोडतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.