‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. तर आतापर्यंत ती अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते. प्राजक्ता जेव्हापासून काम करू लागली आहे तेव्हापासून तिच्या लांब सडक केसांनी सर्वांचाच लक्ष वेधलं. आता तिने या लांब सडक केसांचं रहस्य सांगितलं आहे.
प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. विविध पोस्ट शेअर करत ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने ती काय करते ज्यामुळे तिचे केस इतके लांब सडक असूनही मजबूत राहतात हे तिने सांगितलं.
आणखी वाचा : “तू लग्न कधी करत आहेस?” अखेर प्राजक्ता गायकवाडने दिलं उत्तर, म्हणाली…
या सेशनच्या निमित्ताने प्राजक्ताच्या चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांमध्ये तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा समावेश होता. या दरम्यान एका चाहत्याने तिला विचारलं की “तुझे केस एवढे लांब कसे?” त्यावर उत्तर देत प्राजक्ता म्हणाली, “कदाचित शीर्षासनामुळे.” असं लिहित तिने त्या उत्तराला हसण्याचाही इमोजी दिला.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/08/Prajaktaa.jpeg?w=318)
हेही वाचा : प्राजक्ता गायकवाडने केला तिच्या नव्या घरात गृहप्रवेश, पाहा खास झलक
आता तिचं हे उत्तर खूप चर्चेत आलं आहे. या व्यतिरिक्त तिला “तुझ्या आगामी चित्रपटाचं नाव काय?”, “तुला पुन्हा ऐतिहासिक भूमिका करायला आवडेल का?”, “तुझं शिक्षण लवकर?”, “तू लग्न कधी करणार? असे अनेक प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांची प्राजक्ताने दिलखुलासपणे उत्तरं दिली.