मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. गेल्या काही वर्षांपासून प्राजक्ता ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. त्यानंतर आता प्राजक्ताचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे.

प्राजक्ता माळी ही सध्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेताना दिसत आहे. प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वी पुण्यात नवीन घर खरेदी केलं होतं. त्यानतंर आता प्राजक्ताने फार्म हाऊस खरेदी केले आहे. प्राजक्ताचे हे फार्महाऊस कर्जतमध्ये डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे.
आणखी वाचा : “मलाच प्रपोज करावं लागलं होतं, कारण…” प्राजक्ता माळीने केला लव्ह लाईफबद्दल खुलासा

8.12 lakh tonnes of soybeans were procured at guaranteed prices 37 lakh sold privately
३८ लाख टन सोयाबीन कवडीमोल दरात
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Soybean purchase , Soybean rate,
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळूनही दर घसरणीला…
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
चंद्रपूर : नायलॉन मांजा विक्री करणारे हद्दपार, राज्यातील पहिलीच कारवाई
selection process for next chief election commissioner
अन्वयार्थ : सरकारी खातेच जणू…
Sensex retreats below 78 thousand due to selling pressure
विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्सची ७८ हजारांखाली पीछेहाट
massive dividend shareholders TCS IT company
मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी

प्राजक्ताने नुकतंच या फार्महाऊसचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. यात ती तिच्या फार्महाऊसच्या बाहेर उभी असल्याचे दिसत आहे. तिच्या आजूबाजूला हिरवागार निसर्गही पाहायला मिळत आहे. प्राजक्ताने या फोटोला कॅप्शन देताना याबद्दल माहिती दिली आहे.

प्राजक्ता माळीची पोस्ट

“स्वप्न साकार…
Happy owner of my dream “Farm House”.
(डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे,एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं.) कर्जत

नाव असणार आहे- “प्राजक्तकुंज”.
(१- प्राजक्तप्रभा
२- प्राजक्तराज
३- प्राजक्तकुंज
प्राजक्तत्रयी पुर्ण.)

खानदानातली सर्वात सुंदर प्रॉपर्टी, खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत..
फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या… #हक्काचंघर #प्राजक्तकुंज #गुरुकृपा #gratitude #prajakttamali”, असे प्राजक्ताने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी लग्न करायला तयार, पण…” प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट

आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

प्राजक्ताच्या या फोटोवर अभिनेत्री अमृता खानविलकरने कमेंट केली आहे. “वाह वाह… झालं का? अभिनंदन प्राजू”, असे म्हटले आहे. तर अभिनेत्री ऋतुजा बागवेने “अभिनंदन डार्लिंग” असे म्हणत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader