अभिनेत्री प्राजक्ता माळीने अल्पावधीतच उत्तम काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे तिचं नशिब बदललं. पण अभिनयक्षेत्रामध्येच करिअर करायचं हे प्राजक्ताचं ठरलेलं नव्हतं. हौस म्हणून तिने या क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. आता ती एक उत्तम व्यावसायिकाही आहे. याचबाबत तिने भाष्य केलं आहे.
‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ताने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. एखाद्या अभिनेत्रीला मिळालेलं यश पाहून तुला काही वाटतं का? असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला. यावेळी प्राजक्ताने दिलेल्या उत्तराने सगळ्यांचीच मनं जिंकली.
प्राजक्ता म्हणाली, “मला काही वाटत नाही. माझ्या ते स्वभावातच नाही. महत्त्वाचं म्हणजे मी क्लासिकल डान्सर आहे. यामध्ये मी शिक्षणही घेतलं आहे. त्यामुळे अभिनयक्षेत्रामध्ये काही झालं नाही तर माझ्याकडे पर्याय होता. अजूनही माझे पुण्यामध्ये डान्स क्लासेस आहेत. अभिनेत्री व्हायचं हे काही ठरलं नव्हतं. अचनाक भयानक मी या क्षेत्रामध्ये आले.”
आणखी वाचा – अशी दिसते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक, खास पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दिविजा तुला…”
प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच स्वतःचा प्राजक्तराज हा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. ती अभिनयासह सुत्रसंचालन करते. शिवाय तिचे डान्स क्लासेसही आहेत. एकाचवेळी अनेक भूमिका बजावणं प्राजक्ताला उत्तमरित्या जमतं. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेनंतर प्राजक्ताचं नशिब बदललं. त्यानंतर तिने अभिनयक्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला.