‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाबरोबरच आता प्राजक्ताने बिझनेसवुमन म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. काही महिन्यांपूर्वी तिने ‘प्राजक्तराज’ हा दागिन्यांचा नवाकोरा ब्रॅंड लॉंच केला होता. मनोरंजन विश्वातील अनेकांनी तिच्या या नव्या व्यवसायाचे कौतुक केले.

हेही वाचा : “ड्रग्ज घेते म्हणून गोरी आहे”, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “एका निर्मात्याने…”

when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Purva Kaushik
‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने ऑनस्क्रीन बहिणीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाली…
Pirticha Vanva Uri Petla fame Indraneil Kamat meet tejashri Pradhan photo viral
‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ फेम इंद्रनील कामतची तेजश्री प्रधानबरोबर ग्रेट भेट, अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला, “तू खूप दयाळू…”
mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul wants to work with Bollywood celebrities Salman Khan, Deepika Padukone
‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायरा वायकुळला बॉलीवूडच्या ‘या’ सेलिब्रिटीबरोबर करायचं आहे काम, म्हणाली…

प्राजक्ता माळीने अलीकडेच मनोरंजन विश्वातील आपल्या एका जवळच्या मैत्रिणीला प्राजक्तराजचा ‘तन्मणी’ गिफ्ट दिला आहे. अश्विनी कासार ही प्राजक्ताची चांगली मैत्रीण आहे. अश्विनीला तन्मणी देतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अश्विनी म्हणते, “ही खरंच खूप गोड भेटवस्तू आहे. मला कधीतरी हा ‘तन्मणी’ मिळावा…अशी माझी मनापासून इच्छा होती.” यावर प्राजक्ता माळी “मला तुझ्या मनातलं कळालं” असे म्हणत अश्विनीला तन्मणी गिफ्ट देते.

हेही वाचा : ‘बिग बॉस’नंतर अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने पहिल्यांदाच केले ऑनस्क्रीन एकत्र काम, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री अश्विनी कासारने साडी नेसून त्यावर प्राजक्ताने गिफ्ट दिलेला ‘तन्मणी’ परिधान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिला प्राजक्ताने दिलेले गिफ्ट फारच आवडले आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या दोन्ही अभिनेत्रींचे कौतुक केले आहे. यापूर्वी प्राजक्ताने अभिनेत्री वनिता खरातला लग्नानिमित्त दागिने गिफ्ट दिले होते.

हेही वाचा : सई ताम्हणकरने सोनाली कुलकर्णी व तिच्या नवऱ्याला ठेवलं होतं उपाशी, खुलासा करत म्हणाली, “कारण…”

दरम्यान, प्राजक्ता माळीने अभिनय आणि व्यवसाय सांभाळून अलीकडेच कर्जतमधील नव्या फार्महाऊसची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. तर, अभिनेत्री अश्विनी कासारने ‘सावित्रीजोती’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

Story img Loader