मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर मनोरंजसष्टीत वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ताला खरी ओळख मिळाली.

हेही वाचा- ‘असा’ असतो कविता मेढेकरांच्या घरचा गणेशोत्सव, म्हणाल्या, “सासूबाईंच्या निधनानंतर सासऱ्यांनी विचारलं की…”

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
mutual fund investment
माझ्यासाठी ‘सही’ ठरशील ? माझी गुंतवणूक केल्या केल्या का घसरते?
New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
hingoli bogus applications for crop insurance
हिंगोलीतही १८१४ बोगस पीक विमा अर्ज आले समोर; बेचीराख, शासकीय जमिनीवरही काढला विमा
Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
Anajli Damania on dhananjay Munde
“…आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्याच”, भर पत्रकार परिषदेत पुरावे सादर केल्यानंतर अंजली दमानियांची मागणी!
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”

करिअरबरोबरच प्राजक्ताने वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने पुण्यात नवीन घर खरेदी केलं होतं. त्यानतंर आता प्राजक्ताने फार्म हाऊस खरेदी केले आहे. कर्जतमध्ये डोंगराच्या कुशीत प्राजक्ताचं फार्महाऊस आहे. प्राजक्तकुंज असं तिच्या फार्महाऊसच नाव आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर या फार्महाऊसचे फोटोही पोस्ट केले आहे. नुकतंच एका मुलाखतीत प्राजक्ताने हे फार्महाऊस घेण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- “सोहम, सुचित्रा यांच्यामुळेच मी…”, आदेश बांदेकरांनी मानले पत्नीचे आभार, म्हणाले “होम मिनिस्टरने…”

प्राजक्ता म्हणाली, “मला निसर्गात राहायला खूप जास्त आवडतं. मी अख्खा दिवस झाडाखाली काढू शकते. माझ्या आत्मिक समाधानातून मी फार्महाऊस घेण्याचा निर्णय घेतला. गुंतवणूक वगैरे ही नंतरची गोष्ट आहे. मला एवढं मोठं फार्महाऊस घ्यायच नव्हतं. माझं तेवढं बजेटही नव्हतं. पण ते घर बघितल्यानंतर मी त्याच्या प्रेमात पडले. कारण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरवळंच दिसते. घराच्या मागे डोंगर, धबधबे आणि झरे आहेत. तिथे फक्त पाण्यांचा आवाज येतो. शेवटी मी विचार केला सगळं गेलं तेल लावत. एखादी गोष्ट आवडली तर रुखरुख करुन जगण्यात काय अर्थ आहे.”

हे फार्महाऊस खरेदी करण्यासाठी प्राजक्ताने खूप मोठं कर्ज काढलं असल्याचं सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर या फार्महाऊसचे फोटो शेअर करताना प्राजक्ताने लिहिलं होतं. “खानदानातली सर्वात सुंदर प्रॉपर्टी, खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत.. फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या…” काही दिवासांपूर्वी या फार्महाऊसवर हास्यजत्रेच्या कलाकारांनी प्राजक्ता माळीचा वाढदिवस साजरा केला होता. प्राजक्ताच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ अभिनेत्री वनिता खरातने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता.

Story img Loader