मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळीने नुकतंच विजयादशमीनिमित्त ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ने ‘विजयादशमी उत्सव’ कार्यक्रमाला हजेरी लावली. याचे काही फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले होते. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. आता तिने या कार्यक्रमाला जाण्याचे कारण सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राजक्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यासाठी हजेरी लावल्यानंतर आता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने काही फोटो शेअर केले आहे. या फोटोत ती, शंकर महादेवन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहायला मिळत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने नागपूरला जाण्यामागचे कारण सांगितले आहे.
आणखी वाचा : “दुसरं लग्न कधी करणार?” तेजस्विनी पंडित म्हणाली, “माझ्या आयुष्यात पुरुष…”

प्राजक्ता माळीची पोस्ट

“खरे तर देवेंद्रजींच्या मतदारसंघातील गरबा कार्यक्रमासाठी नागपूरला गेले होते आणि त्यांच्याकडे एक कामही होतं. विजयादशमी उत्सवात भेटीसाठी थोडा वेळ हवा असे मी म्हणताच, त्यांनी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून दिला.

“काहीही मदत लागली तर सांगा, we are here to help you, We adore your work”.. इति – देवेंद्रजी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असं म्हणतात तेव्हा खरच खूप आधार वाटतो. त्यांच्या या अनमोल वाक्यांसाठी त्यांचे आभार मानायले शब्द अपूरे पडतायेत”, असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.

आणखी वाचा : “पहिलाच सिन होता, स्क्रीप्ट हातात आलं अन्…”, किरण मानेंच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाले “मी ज्यांची भूमिका…”

दरम्यान, प्राजक्ता माळीच्या या पोस्टनंतर तिचे अनेक चाहते यावर कमेंट करताना दिसत आहेत. “मला वाटत तुम्ही मनसे मधून बीजेपी प्रवेश करणार वाटत”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “तुमच्यासाठी वेळ काढतील. पण एखादा सामान्य माणूस भेटायला गेला तर भेटणार नाहीत, वेळ नसतो तेव्हा त्यांना, शेवटी अभ्यास महत्त्वाचा आहे ना”, अशी कमेंट केली आहे. तर एकाने “किती ग बाई आधार वाटला … राजकारणी झालीस हा प्राजु…. सॉरी, प्राजक्ता मॅडम”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prajakta mali reveled reason why she went for rss dasara melava in nagpur meet devendra fadnavis nrp