अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहचली. सोशल मीडियावर प्राजक्ता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते.
हेही वाचा- “… तर दंगली उसळल्या असत्या”, अमित सानाच्या आरोपांवर पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत स्पष्टच बोलला
प्राजक्ता अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसते. आपल्या भाचीचे फोटो ती सोशल मीडियावर शेअऱ करत असते. दरम्यान प्राजक्ताने नुकताच तिच्या भाचीचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्तातीची भाची प्राजक्ताचे केस विंचरताना दिसत आहे. व्हिडीओ शेअऱ करत प्राजक्ताने लिहिलं “मला मानेवरचे केस नीट विंचरता येत नसावेत, असं तीला वाटतं. म्हणून मी बाहेर जाताना आणि बाहेरून आल्यावर ती माझे केस विंचरते. म्हणून मी घरातून जायची आणि यायची ती वाट बघते. Video काढतेय कळलं की लपते (मध्ये काय बोललीस ते मलाही नाही कळलय अजून)”
प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर लाईक आणि कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं “कधी जाणार म्हणजे कधी लग्नं करुन जाणार असं विचारत असणारं” तर “गोड गोड आत्तुची गोड गोड भाच्ची” असं म्हणतं अनेकांनी प्राजक्ताच्या भाजीचे कौतुक केले आहे.
प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच मनोरंजन करत आली आहे. प्राजक्ताची रानबाजार बेवसिरीज चांगलीच गाजली. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.