मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांतून प्राजक्ता घराघरांत पोहोचली. नुकतंच प्राजक्ताने तिची यंदाची दिवाळी कशी साजरी केली, याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राजक्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. यातील पहिल्या फोटोत तिचे संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे. त्यानंतर तिने घरातील जेवण, शॉपिंग आणि भाच्यांचा घेतलेला अभ्यास याचे फोटो पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा : “गाठी सोडवून देणारा तो माणूस आयुष्यात राहिला नाही…” कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला “फटाके प्रदूषणाचा…”

प्राजक्ता माळीची पोस्ट

“सण दिपावली…. संपूच नये असं वाटतं..
(फोटो दुसरा- यावेळी थेट भारती हॅास्पिटलच्या आयूर्वेद सेंटर मध्ये जाऊन भाच्यांना अभ्यंग घडवले.)
.
1- Abhyang
2- Shopping
3- Watching film in theatre
4- Hoteling
5- Niece’s Diwali Homework.
Attu’s Diwali bucket list completed

भाच्यांचाहट्ट #बालहट्ट दोन फुलबाजेही उडवले. #कुटूंब सालाबादप्रमाणे फराळ खाऊन १ किलो वजनही वाढलंय…”, असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीच्या भावाने खरेदी केला ट्रॅक्टर, वडिलांचा उल्लेख करत म्हणाली…

दरम्यान तिच्या या फोटोवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यावर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. तर काहींनी प्राजक्ताला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.