मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच चर्चेत असते. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. प्राजक्ताने एका कार्यक्रमादरम्यान तिच्या कॉलेज जीवनातील एक प्रसंग सांगितला होता.

प्राजक्ता अभिनेत्रीबरोबरच एक उत्तम नृत्यांगणा व लेखिकाही आहे. प्राजक्ताचं ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तकही प्रकाशित झालं आहे. सुरुवातीला तिला डायरी लिहायचीही आवड होती. त्यामुळे दिवसभरात घडलेल्या सगळ्या गोष्टींची नोंद प्राजक्ता डायरीमध्ये करायची. प्राजक्ता कॉलेजमध्ये शिकत असताना डायरी तिच्या आईला सापडली. याचाच किस्सा प्राजक्ताने सांगितला होता.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!

हेही वाचा>> लग्नाच्या दहा वर्षांनंतर राम चरण होणार बाबा, पोस्ट शेअर करत दिली गूड न्यूज

“एखाद्या प्रसंगाबद्दल मला जे वाटतं ते मी माझ्या डायरीत लिहायचे. त्यावेळी एखाद्या प्रसंगाबाबत काय वाटत होतं, हे आज वाचताना मला फार गंमत वाटते. आज माझ्याकडे ७-८ वर्षांपूर्वीच्याही डायरी आहेत. असंच एके दिवशी माझ्या आईला माझी डायरी सापडली. तेव्हा मी अकरावीत शिकत होते”, असं प्राजक्ता म्हणाली.

हेही वाचा>> अभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर राम गोपाल वर्माने कुत्र्याशी केली स्वतःची तुलना, म्हणाला…

पुढे ती म्हणाली, “मी कॉलेजमधून घरी यायची, आई वाटच बघत होती. घरी आल्यानंतर मला आईने झाडूने बेदम मार दिला. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता मी त्या डायरीत काय काय लिहिलं असेल”. प्राजक्ताने हा प्रसंग सांगताच कार्यक्रमात हशा पिकला होता.

हेही वाचा>> “…अन् १५ सेकंदात सर्रकन भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरून गेला” प्रसाद खांडेकरची पोस्ट चर्चेत

‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्राजक्ताने मालिकांसह चित्रपटांतही काम करुन अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे.