प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयाच्या जोरावर तिने अल्पावधीच कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पाडणारी प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकताच प्राजक्ताने सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे प्राजक्ता सूत्रसंचालन करते. तिच्या खुमासदार शैलीने ती कार्यक्रमात रंगत आणते. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी प्राजक्ता उत्तमरित्या पार पाडते. परंतु, सूत्रसंचालन करण्यासाठी प्राजक्ता नेमकी कशी तयारी करते?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतो. याबाबतचा एक व्हिडीओ प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर

हेही वाचा >> ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून भडकली उर्फी जावेद, म्हणाली “लैंगिक शोषण करणाऱ्या…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या सेटवरील या व्हिडीओमध्ये प्राजक्ता मेकअप रुममध्ये शूटिंग सुरू होण्याआधी सूत्रसंचालनाची तयारी करताना दिसत आहे. मोबाईलवर ती स्क्रिप्ट वाचून त्याचं पाठांतर करत आहे. एकीकडे हे सगळं सुरू असताना तिचा मेकअपही केला जात आहे.विशेष म्हणजे स्क्रिप्टसाठी प्राजक्ता कागदाचा वापर करत नाही. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये तिने स्वत:च याबद्दल सांगितले आहे. मोबाईलवर स्क्रिप्ट वाचून कागदाची बचत करत असल्याचं प्राजक्ता म्हणाली आहे. “मला स्क्रिप्ट मोबाईलवरच शेअर करत जा. मी त्यावरूनच वाचून पाठांतर करत जाईन”, असं तिने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.  

हेही पाहा >> Photos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का?

हेही वाचा >> प्रिया बापटचा वेब सीरिजमधील बोल्ड सीनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आई म्हणाली, “चूक झाली…”

प्राजक्ताने छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून ती घराघरात पोहचली. मालिकांसह तिने चित्रपटातही काम केलं आहे. ‘पावनखिंड’, ‘लकडाऊन’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातून तिने अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. नुकतीच प्राजक्ता चित्रपटाच्या शूटिंगनिमित्ताने लंडनला गेली होती.

Story img Loader