मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अभिनयाच्या जोरावर प्राजक्ताने अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. ‘चंद्रमुखी’, ‘लकडाऊन लग्न’ या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारलेली प्राजक्ता ‘पांडू’ चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. चित्रपटात ‘करुणाताई पठारे’ ही भूमिका साकारुन प्राजक्ताने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. या भूमिकेसाठी तिला नुकताच ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ चा ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’ हा पुरस्कार मिळाला आहे.
हेही वाचा>> “जगातील सगळ्यात…”, पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर राखी सावंतची पहिली पोस्ट
प्राजक्ता माळीने पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्या सोशल मीडियावरुन फोटो पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. “कष्टाचं चीज व्हायला सुरूवात झाली असं म्हणायला हरकत नाही…बक्षिस…भरभरून votes दिल्याबद्दल सबंध महाराष्ट्राचे मनापासून आभार. असंच अविरत प्रेम आणि अखंड पाठिंबा आणि आशीर्वाद असू देत, हीच विनंती. मला खलनायिका म्हणून काम करायला मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं, त्यात हा पुरस्कार मिळाला…त्यामुळे विशेष आनंद…माझे सर्व सहकलाकार, तंत्रज्ञ, team पांडू आणि ज्यांनी मला ह्या भूमिकेसाठी निवडल ते म्हणजे विजू माने ह्यांचे विशेष आभार…”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>>डीप नेक ड्रेसमध्ये फोटोशूट केल्यामुळे प्रार्थना बेहरे ट्रोल, नेटकरी म्हणाले “म्हातारी…”
हेही पाहा>>Birthday Special: गौरव मोरेला केसांमुळे मिळालेली गुगलची जाहिरात; स्वत:च सांगितलेला किस्सा
छोट्या पडद्यावरुन कलाविश्वात पदार्पण केलेली प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोचं सूत्रसंचालन करत आहे. तिने नुकताच तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरू केला आहे.