Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सदस्य सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांचे फोटो, व्हिडीओ हे सतत व्हायरल होताना दिसत आहेत. सहाव्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर झालेला छोटा पुढारी म्हणजे घनःश्याम दरवडेचा ( Ghanshyam Darode ) एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. “मी कधी बिग बॉसच्या घरात राजकारण केलं नाही”, असं वक्तव्य व्हायरल व्हिडीओमध्ये घनःश्याम करताना दिसत आहे. याच व्हिडीओवर मराठी अभिनेत्री प्रतिक्रिया दिली आहे; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये घनःश्याम दरवडे नेमकं काय म्हणाला?
‘लोकशाही मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये घनःश्याम दरवडे म्हणाला होता की, मी जर ठरवलं असताना मला ‘बिग बॉस’च्या घरात राजकारण करायचं आहे. चुटकी सरशी मी राजकारण केलं असतं. मला राजकारण करायला वेळ लागला नसता. मला माहित होतं, सदस्य किती कमकुवत आहेत आणि ते किती विचार करणारे आहेत. पण मी माझ्या सदस्यांना कधीच कमकुवत समजलं नाही. मी राजकारण करून खेळलो असतो तर मला जास्त वेळ घरात राजकारण करायला लागला नसता. पण, मी घरातील एक सदस्य म्हणून खेळलो ते मला आज आठवतंय.
घनःश्याम दरवडेचा हा व्हिडीओ अभिनेत्री प्रणित हाटेने ( Pranit Hatte ) इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री प्रणित हाटे छोट्या पुढाऱ्याला टॅग करत म्हणाली, “हड मेल्या…’बिग बॉस मराठी’ला तू कलंक होतास.” प्रणितच्या या पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
![Pranit Hatte Instagram Story](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/10/Pranit-Hatte.jpeg?w=310)
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर आल्यानंतर घनःश्याम म्हणाला होता की, मी सहा आठवडे घरात होतो आणि माझा प्रवास खूप चांगला होता. खरंतर, मी खऱ्या आयुष्यात जसा आहे अगदी तसाच घरात राहिलो…एकदम रिअल राहण्याचा मी प्रयत्न केला. या शोमध्ये खोटं वागून मला बाहेर यायचं नव्हतं.