मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखले जाते. अनेक मालिका आणि चित्रपटांमुळे ती घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. प्रार्थना बेहेरे ही कायमच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकतंच तिने जीवनाबद्दल एक छान पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रार्थना बेहेरे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आयुष्याबद्दल खास पोस्ट केली आहे.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

“तुम्ही आता इथे श्वास घेत असताना, दुसरीकडे एखादी व्यक्ती शेवटचा श्वास घेत असते. त्यामुळे सतत तक्रार करणे थांबवा आणि तुमच्याकडे जे आहे, त्यात आयुष्य जगायला शिका, अशा आशयाची पोस्ट प्रार्थना बेहेरेने केली आहे.

प्रार्थना बेहेरे पोस्ट

आणखी वाचा : “…आणि त्याने मला किस केलं” रसिका सुनीलचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली “माझ्या नवऱ्याला…

दरम्यान सध्या प्रार्थना ही झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये नेहा कामत ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची देखील चांगली पसंती मिळाली आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेला आणि मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prarthana behere share life quotes see post nrp