मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या चर्चेत आहे. अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:ची ओळख निर्माण करणारी प्रार्थना तिच्या मोहक अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते. प्रार्थनाचा चाहता वर्गही मोठा आहे. प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
प्रार्थनाने नुकतंच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केलं आहे. तिने लॅव्हेंडर रंगाची पॅण्ट व त्यावर हटके टॉप परिधान करत फॅशन केली आहे. साजेसा मेकअप व केस मोकळे सोडून प्रार्थनाने फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचा एक व्हिडीओ प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. परंतु, प्रार्थनाचं हे हटके फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं नसल्याचं दिसत आहे.
हेही वाचा>> अखेर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका होणार बंद! ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग
हेही पाहा>> Birthday Special: गौरव मोरेला केसांमुळे मिळालेली गुगलची जाहिरात; स्वत:च सांगितलेला किस्सा
प्रार्थनाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी प्रार्थनाच्या ड्रेसवरुन तर काहींनी तिच्या लूकवरुन तिला ट्रोल केलं आहे. “म्हातारी बाई दिसतेस गं तू”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “म्हातारी दिसायला लागली आहेस”, असं म्हटलं आहे. एका युजरने कमेंट करत “असे कपडे घालू करू नकोस” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “छान दिसतेस, पण नेक खूप डिप आहे”, अशी कमेंट केली आहे.
हेही वाचा>> अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्यातील ‘त्या’ कृतीमुळे आर्यन खान ट्रोल, नेटकरी म्हणतात “नशेत…”
‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रार्थना सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्रार्थनाने अनेक मराठी चित्रपटांतही काम केलं आहे.