मराठी कलाविश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखले जाते. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे प्रार्थना पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आली. प्रार्थना ही सिनेसृष्टीत सक्रीय असण्याबरोबरच कायमच सामाजिक भान जपताना दिसते. नुकतंच तिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
प्रार्थना बेहरेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने थॅलेसीमिया या आजाराबद्दल सांगितले आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
आणखी वाचा : Video : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीचं नाव घेत प्रार्थना बेहेरेने दिलेले थेट उत्तर
प्रार्थना बेहेरेची पोस्ट
“थॅलेसीमिया हा एक असा आजार आहे जो मुलानं मध्ये जन्मापासूनच असतं. आणि जन्मल्याच्या 3 महिन्यानंतर त्याचे लक्षण दिसून येतात. तज्ज्ञ सांगतात की या आजारामध्ये बाळाच्या अंगात रक्ताची कमी होऊ लागते. जेणे करून त्याला बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता येते. वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोह तत्त्व जमा होतं जे पुढच्या आयुष्यात हृदयासाठी प्राणघातक ठरू शकतं. दरवर्षी 8 मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसीमिया दिन साजरा केला जातो. आणि आज ही संधी माल मिळाली….
मला आज या कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल जॅकी श्रॉफ यांचे आभार. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश या दुर्मिळ आजाराबद्दल जनजागृती करणे हा आहे. चला थॅलेसीमिया विरुद्ध लढूया आणि रक्तदान करूया”, असे प्रार्थना बेहेरेने म्हटले.
आणखी वाचा : ‘क्रश’ प्रकरणानंतर पहिल्यांदाच ओंकार भोजने आणि कोकण हार्टेड गर्लची भेट, लाजत म्हणाली “‘त्या’नंतर…”
दरम्यान प्रार्थना ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. अनेक मालिका आणि चित्रपटांमुळे ती घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वी ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होती.