‘शुभमंगल ऑनलाइन’ मालिकेत कौमुदी ही भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री प्रतिमा देशपांडे आई झाली आहे. प्रतिमाने काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला. आता तिच्या मुलीचा नामकरण सोहळा पार पडला. तिने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करून मुलीचं नाव जाहीर केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीसह हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी प्रतिमा देशपांडे हिने वर्षभरापूर्वी २३ डिसेंबर २०२३ रोजी समीप परांजपेशी लग्न केलं. त्यानंतर तिने ऑगस्ट महिन्यात डोहाळे जेवणाचा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. प्रतिमाने नवरात्र पंचमीला मुलीला जन्म दिला. तिने आता मुलीचा नामकरण सोहळा आयोजित केला आणि मुलीचं नाव चाहत्यांशी शेअर केलं.

हेही वाचा – दिसण्याबद्दल विनोद करणाऱ्या कपिल शर्माला ॲटली कुमारने दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाला, “मी कसा दिसतो…”

प्रतिमा देशपांडेने लाडक्या लेकीचं नाव ‘अहना’ ठेवलं आहे. तिने काही सुंदर ओळी शेअर करून लेकीचं नाव जाहीर केलं. व्हिडीओत मुलीचं नाव लिहितानाचे क्षण पाहायला मिळतात.
तिमिराच्या चांदण्यावर पसरली
सोनेरी किरणांची आभा ।

डोंगराच्या कुशीतून उगवली
तेजस्वी सुर्याची प्रभा ॥

नवरात्र पंचमीला लेवून सोन्याचा गहना
शुभ पावलांनी आली , परांजप्यांची अहना ॥

प्रतिमाच्या मुलीचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. नामकरण सोहळ्यात पाहुण्यांची मांदियाळी दिसत आहे.

हेही वाचा – २३ डिसेंबरपासून ‘झी मराठी’वर होणार मोठा बदल! ३ मालिकांच्या वेळा बदलल्या, ‘ही’ सिरीयल होणार बंद, तर नवीन मालिका…

दरम्यान, प्रतिमा देशपांडेने काही गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच एका चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून ती झळकली होती. प्रतिमाने ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘संत गजानन शेगावीचे’ मालिकेत जानकीची भूमिका केली होती. तसंच तिने याआधी ‘कलर्स मराठी’वरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ मालिकेतही काम केलं होतं. या मालिकेत तिने कौमुदीची भूमिका साकारली होती. ‘सोनी टीव्ही’वरील ‘विघ्नहर्ता गणेश’ मालिकेत प्रतिमाची महत्त्वाची भूमिका होती. तसेच‘पाटील’ चित्रपटात तिने मुख्य भूमिका केली होती.

हेही वाचा : …तर प्राजक्ता माळीला भरायला लागणार होते कोटी रुपये, १८ टक्के व्याजासकट; ‘फुलवंती’साठी केलेला सर्वात मोठा करार, म्हणाली…

प्रतिमाच्या पतीचे नाव समीप परांजपे आहे. समीप हा आर्किटेक्ट आहे. प्रतिमा व समीप दोघे कॉलेजपासून मित्र होते. त्यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये गिरनार पर्वतावरील दत्त मंदिरात साखरपुडा केला होता. त्यानंतर २३ डिसेंबर दोघांनी लग्न केलं. आता हे दोघेही एका गोंडस लेकीचे आई-बाबा झाले आहेत. त्यांनी लेकीचं नाव अहना ठेवलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress pratima deshpande baby naming ceremony video viral on social media hrc