Marathi Actress : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा आई होणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली होती. गरोदर असल्यामुळे तिने ‘झी मराठी वाहिनी’वरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका सोडली. ऑक्टोबर महिन्यात खुशबूच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अशातच मराठी मालिकाविश्वातील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार असल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी आणि हिंदी मालिकाविश्वात आपल्या सहसुंदर अभिनयाचा छाप उमटवणारी अभिनेत्री प्रतिमा देशपांडे आई होणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रतिमाने समीप परांजपेशी लग्नगाठ बांधली. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मोठ्या थाटामाटात प्रतिमाचा लग्नसोहळा झाला होता. लग्नाच्या आठ महिन्यांनंतर अभिनेत्रीने आनंदाची बातमी जाहीर केली आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीबरोबर साजरे केले रक्षाबंधन, फोटो शेअर करत म्हणाला…

pratima deshpande

अभिनेत्रीचा पती समीप परांजपेने सोशल मीडियावर डोहाळे जेवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला कुटुंबातील महिला डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची तयारी करताना दिसत आहेत. डोहाळे जेवणासाठी प्रतिमाने हिरव्या रंगाची साडी नेसली असून त्यावर फुलांची ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये प्रतिमा खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/08/Pratima-Deshapande.mp4

दरम्यान, अभिनेत्री प्रतिमा देशपांडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘संत गजानन शेगावीचे’ मालिकेत जानकीची भूमिका साकारली होती. तसंच तिने याआधी ‘कलर्स मराठी’वरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ मालिकेतही काम केलं होतं. या मालिकेत तिने कौमुदीची भूमिका निभावली होती. तसंच तिने हिंदी मालिकेतील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘सोनी टीव्ही’वरील ‘विघ्नहर्ता गणेश’ मालिकेत प्रतिमाने काम केलं होतं. याशिवाय ती ‘पाटील’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकली होती.

हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांना रुग्णालयात केलं दाखल, पाच दिवस आराम करण्याचा डॉक्टरांनी दिला सल्ला

हेही वाचा – Video: ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार संदीप खरेंची मुलगी, खास पोस्ट करत म्हणाले, “लाडक्या लेकीची दुसरी मालिका…”

दत्त मंदिरात प्रतिमाने केला होता साखरपुडा

प्रतिमा अभिनया व्यतिरिक्त व्लॉग करते. ती एक लोकप्रिय युट्यूबर आहे. तिच्या युट्यूब चॅनलवर तिने आतापर्यंत बरेच ट्रॅव्हल व्लॉग शेअर केले आहेत. या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये तिचा नवरा समीप देखील असतो. प्रतिमा व समीपची कॉलेजपासून मैत्री आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गिरनार पर्वतावरील दत्त मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने दोघांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर २३ डिसेंबर दोघं लग्नबंधनात अकडले. समीप हा आर्किटेक्ट आहे. तसंच त्याचा फॉनिक्स ऑर्किटेक्ट इंडिया या नावाचा व्यवसाय आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress pratima deshpande pregnant share baby shower video pps