छोट्या पडद्यावरील ‘बस बाई बस’ शोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कलाविश्वाप्रमाणेच इतर क्षेत्रातील कर्तृत्वान महिला या शोमध्ये सहभागी होतात. अभिनेता सुबोध भावे या शोचं सूत्रसंचालन करत आहे. मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने या शोमध्ये हजेरी लावली.सुबोध भावे आणि कार्यक्रमातील इतर महिलांनी मिळून प्रियाला बोलतं केलं. प्रियाने शोमध्ये विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना मजेशीर उत्तरे दिली. प्रियाने कार्यक्रमात तिच्याबरोबर घडलेले अनेक किस्से शेअर केले. नाटक, मालिका, चित्रपट यामधून प्रियाने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. तिने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

हॉटस्टारवरील ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या सीरिजमधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. याच सीरिजमध्ये प्रियाने बोल्ड सीन्सही दिले होते. यामुळे तिला खूप ट्रोलही करण्यात आलं होतं. वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्सचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याबद्दल कार्यक्रमातील महिलेने प्रियाला “वेब सीरिजमधील बोल्ड सीन्स पाहिल्यानंतर आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती?”, असा प्रश्न विचारला.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…

हेही वाचा >> “नाटकाचा प्रयोग सुरू असताना लघुशंका आली अन्…”, प्रिया बापटने सांगितला ‘तो’ किस्सा

हेही वाचा >> पुरस्कार सोहळ्यात भाषण देत होती आलिया भट्ट, बाळाने पोटात पाय मारला अन्…

प्रिया यावर उत्तर देत म्हणाली, “माझ्या आई-वडिलांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे त्यांनी वेब सीरिजमधील माझा बोल्ड सीन पाहिला नाही. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येते. त्यामुळे हा सीन बघितल्यानंतर माझ्या आई-वडिलांना काय वाटेल, याचं मला दडपण आलं होतं. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी त्यांना फोन केला. मी असा बोल्ड सीन शूट केला आहे आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय, याची त्यांना कल्पना दिली. तुम्हाला माझी लाज वाटत नाहीये ना, हेही मी त्यांना विचारलं”.

हेही पाहा >> Photos : ‘आई कुठे काय करते’ मधील यशच्या बहिणीची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

पुढे ती म्हणाली, “यावर माझे बाबा मला म्हणाले, तू एक अभिनेत्री आहेस. ते तुझं काम आहे. त्यामुळे याबाबत उत्तर देण्यासाठी तू आम्हाला किंवा इतर कोणालाही उत्तर देण्यासाठी बांधील नाहीस. माझ्या आईला मी विचारलं, तुला माझ्यामुळे त्रास झाला का? यावर उत्तर देत माझी आई फार गमतीशीर पद्धतीने म्हणाली, चूक झाली. पुढच्या वेळेला नाही करायची. मला वाटतं आपल्या सगळ्यांची आई अशीच छान असते”.

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंच्या लिलावात कंगना रणौतने ‘या’ दोन गोष्टींवर लावली बोली, अयोध्येतील राम मंदिराशी आहे खास कनेक्शन

उत्तम अभिनय आणि सौंदर्याने प्रियाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. अभिनय क्षेत्रात करिअर करत असताना तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं. मालिका, चित्रपट, नाटक आणि वेब सीरिजमधून प्रियाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

Story img Loader