मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्रिया बापटला ओळखले जाते. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं आहे. उत्तम अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणून प्रिया कायमच चर्चेत असते. नुकतंच प्रियाच्या एका पोस्टमुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रिया बापट ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच प्रियाने एक हटके फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने चॉकलेटी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
आणखी वाचा : ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटकाचे प्रयोग अचानक रद्द, कारण उमेश कामतला…
या फोटोशूटचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत. तसेच तिने याचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. या फोटोशूटमधील काही फोटो शेअर करताना तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे.
प्रियाने या फोटोला कॅप्शन देताना “शेवटची पोस्ट, माझं वचन” असे म्हटले आहे. त्याबरोबर तिने उदास असलेला एक इमोजी आणि हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
आणखी वाचा : Video : प्रियांका चोप्रा-रणवीरचा डान्स पाहून शाहरुख खानच्या पत्नीने केलं असं काही…; व्हिडीओ व्हायरल
तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत विविध प्रश्न तिला विचारले आहेत. ‘का शेवटची पोस्ट?’ असा प्रश्न त्यांनी प्रियाला विचारला आहे. तर एकाने ‘नाही, अजून एक पोस्ट करा प्लीझ’, अशी विनंती तिला केली आहे. ‘शेवटची पोस्ट म्हणल्यावर इन्स्टाग्रामचं काय होईल?’ असा प्रश्नही एका चाहत्याने तिला विचारला आहे.