झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अभिनेता सुबोध भावे या शोचं सूत्रसंचालन करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्वान महिला या शोमध्ये सहभागी होतात. सुबोध भावे आणि इतर स्त्रिया मिळून मंचावरील महिलेला बोलतं करतात. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने हजेरी लावली.
उत्तम अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या प्रियाने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. प्रियाने तिच्या खुमासदार शैलीने विचारलेल्या प्रश्नांना मजेशीर उत्तरे देत कार्यक्रमात रंगत आणली. अनेक किस्से शेअर करत प्रियाने कार्यक्रमात हशा पिकवला. मालिका, चित्रपट याबरोबरच प्रियाने नाटकांतही काम केलं आहे. कार्यक्रमात सुबोध भावेने प्रियाला तिच्या नाटकाबद्दल एक प्रश्न विचारला. यावेळी प्रियाने नाटकाचा प्रयोग सुरू असताना तिच्याबरोबर घडलेला किस्सा सांगितला.
हेही वाचा >> Video : ‘ब्रह्मास्र’मधील ‘केसरिया’ गाणं पुन्हा होणार प्रदर्शित, अयान मुखर्जीने शेअर केला खास व्हिडीओ
हेही वाचा >> “लग्न करायचे म्हणून तो रोज माझ्या घरी…”, रिंकूने सांगितला ‘त्या’ चाहत्याचा भयानक किस्सा
सुबोध भावेने प्रियाला “कलाकार कधी वाक्य विसरतात. कधी जास्तीची वाक्य घेतात, यामुळे बऱ्याचदा नाटक लांबतं. अडीच तासाचं नाटक कधीकधी तीन तासाचं होतं. पण याव्यतिरिक्तही काही कारणांमुळे नाटक लांबलेलं मी ऐकलं आहे. नेमंक काय घडलं होतं?”, असं विचारलं.
सुबोध भावेने विचारलेला प्रश्न ऐकताच प्रियाला तिच्याबरोबर घडलेला किस्सा आठवला. किस्सा शेअर करत ती म्हणाली, “उमेश कामत, मी आणि हेमंत ढोमे ’नवा गडी नवं राज्य’ हे नाटक करायचो. पुण्यातील एका प्रयोगाला हा किस्सा घडलेला आहे. नाटकात एका सीनमध्ये मी रंगमंचावरून बाहेर गेल्यावर हेमंत-उमेशचं संभाषण सुरू असतं आणि त्यांच्या काही वाक्यानंतर माझी पुन्हा एन्ट्री होते. प्रयोग सुरू असताना नाटकातील त्या सीनला मी विंगेत(रंगमंचाबाहेर) गेले आणि माझ्या लक्षात आलं की मला लघुशंका आली आहे. पुढे मला संपूर्ण नाटक करायचं होतं. त्यामुळे मी विंगेतून हेंमत आणि उमेशला खुणावून सांगितलं की तुम्ही संभाषण चालू ठेवा. मी पटकन जाऊन येते”.
हेही वाचा >> “लोकलमध्ये मी नेलपेंट, लिपस्टिक विकायचे अन्…”, विशाखा सुभेदारने शेअर केल्या खडतर प्रवासातील आठवणी
“हेंमत आणि उमेशने मी येईपर्यंत संभाषण सुरू ठेवलं होतं. मी पटकन धावत गेले आणि आल्यानंतर त्यांना विंगेतून खुणावलं. मी आले आहे. आता तुम्ही शेवटचं वाक्य घ्या. म्हणजे मला पुन्हा रंगमंचावर एन्ट्री घेता येईल”, प्रियाने हा किस्सा सांगताच सुबोध भावेलाही हसू आवरलं नाही. तो पुढे म्हणाला, “बरेचसे कलाकार असे असतात जे नाटकाची तिसरी घंटा व्हायची आधी बाथरूमजवळ सापडतात. नाटक सुरू व्हायच्या आधी त्यांना प्रेशर आलेलं असतं. पण यावरूनच कलाकारांची त्यांच्या कामावर, नाटकावर असलेली श्रद्धा दिसून येते”.